नेमके काय घडले?
संबंधित विमान कोलकात्याहून रायपूरमार्गे कोल्हापूरसाठी निघाले होते. रायपूर येथे इंधन भरल्यानंतर दुपारी चार वाजून एक मिनिटांनी विमानाने कोल्हापूरकडे उड्डाण केले. मात्र, प्रवासादरम्यान विमानात असलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक अधिकच बिघडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायलटने तात्काळ 'मेडिकल इमर्जन्सी' घोषित केली.
विमान कोल्हापूरच्या हवाई हद्दीत येताच विमान कंपनीने कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडे संपर्क साधून लँडिंगला प्राधान्य देण्याची विनंती केली. कोल्हापूर विमानतळ प्रशासनाने ही विनंती तात्काळ मान्य करत विमान उतरवण्यासाठी सर्व तयारी केली. सायंकाळी विमान सुरक्षितपणे उतरले आणि धावपट्टीवर सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळ कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
advertisement
हे ही वाचा : UPI वापरताना कधीच करु नका 'या' चुका! क्षणार्धात रिकामं होईल बँक अकाउंट
हे ही वाचा : '16 महिन्यांत पैसे दुप्पट', सांगलीची महिला अडकली जाळ्यात, गमावले तब्बल 'इतके' लाख!