TRENDING:

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महापालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 26 पदांसाठी भरती; पगार असणार 40,000 पर्यंत

Last Updated:

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगर पालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे, इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करू शकता. बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये 26 पदांसाठी पदभरती केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई महानगर पालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे, इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करू शकता. बृहन्मुंबई महानगर पालिकेमध्ये 26 पदांसाठी पदभरती केली जात आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍या उमेदवारांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीने “कलाकार आणि लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर” 26 रिक्त पदांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने तरूणांसाठी नोकरीकरिता एक उत्तम संधी निर्माण केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
BMC Recruitment 2025: निवडणुकीसाठी महापालिकेची हायटेक तयारी, टेक्नॉलॉजीमुळे थांबणार मतदारांची धावपळ
BMC Recruitment 2025: निवडणुकीसाठी महापालिकेची हायटेक तयारी, टेक्नॉलॉजीमुळे थांबणार मतदारांची धावपळ
advertisement

डोंबिवलीच्या लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागाच नाही! नेमकं प्रकरण काय?

अर्ज करण्याची सुरूवात 15 सप्टेंबरपासून झाली असून शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून परीक्षेसाठी तयारी करावी. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर नियम आणि अटी अधिकृत संकेतस्थळ वरती प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf स्वरूपात देण्यात आली आहे ती सविस्तर वाचावी! उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. 26 पदसंख्या असलेल्या भरतीमध्ये, उमेदवाराला गुगल फॉर्मच्या पद्धतीने अर्ज करण्याचा ऑप्शन आहे.

advertisement

बाप्पा पावला! गणेशोत्सवात एसटी महामंडाळाने केली तब्बल इतक्या कोंटीची कमाई

कलाकार आणि लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरिता भरती प्रक्रिया केली जाणार आहे. 12 वी उत्तीर्ण, बॅचलर ऑफ फाइन आर्ट (कमर्शियल आर्ट) पदवी परीक्षा, डिजिटल ग्राफिक्समध्ये डिप्लोमा विथ फोटोशॉप आणि कोरेल ड्रॉ संगणकात अभ्यासक्रम आणि संगणकावर कलाकृती तयार करण्याचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराने 1 वर्ष कालावधीचा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवाराने डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी) 6 महिन्यांचा अभ्यासक्रम, महाराष्ट्र सरकारची टंकलेखन परीक्षा मराठी 30 एससीपीएम आणि इंग्रजी 40 एससीपीएम उत्तीर्ण केलेला असावा. उमेदवारांनी डी.ओ.ई., सीसीसी (C.C.C) किंवा (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) पातळी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र धारक असावेत, अशी शैक्षणिक पात्रता कलाकार पदासाठीची आहे.

advertisement

नवी मुंबईत घ्या स्वस्तातलं घर, 22000 घरांची जम्बो लॉटरी, सोडत कधी

तर, लेखापाल कम डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठीची शैक्षणिक पात्रता, 10 वी/12वी उत्तीर्ण, वाणिज्य (B.Com.) मध्ये पदवी परीक्षा प्रमाणपत्र, उमेदवारांकडे “डी.ओ.ई., एसीसी सोसायटी (सीसीसी) किंवा (ओ लेव्हल) किंवा (ए लेव्हल) किंवा (बी लेव्हल) किंवा (सी लेव्हल) लेव्हल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य आणि तंत्रशिक्षण मंडळ MSCIT किंवा GECT प्रमाणपत्र अशी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया राबवित आहे. कंत्राटी पद्धतीने करार तत्वावरती नोकरी मिळवण्याची संधी उमेदवारांना आहे. कंत्राट पद्धतीने केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये उमेदवाराला दरमहा 18,000 ते 40,000 रुपये पर्यंत वेतन मिळेल.. जाहिरातीमध्ये अद्याप परिक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आता लवकरात लवकर परिक्षेच्या दृष्टीने तयारी करावी. उमेदवाराची अर्ज भरण्यासाठीची वयोमर्यादा कमीत कमी 18 असून जास्तीत जास्त 43 वर्षांपर्यंतची आहे. यासोबतच सर्वच उमेदवारांना अर्ज शुल्क मोफत आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महापालिकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 26 पदांसाठी भरती; पगार असणार 40,000 पर्यंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल