CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत घ्या स्वस्तातलं घर, 22000 घरांची जम्बो लॉटरी, सोडत कधी?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
CIDCO Lottery 2025: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. याच परिसरात आपल्याला घर खरेदीची सुवर्णसंधी आहे.
नवी मुंबई: मुंबईसह ठाणे, नवी मुंबई सारख्या महानगरात आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, या परिसरात घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे ‘म्हाडा’ किंवा ‘सिडको’च्या स्वस्तातल्या घरांची अनेकजण वाट पाहात असतात. आता नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. याच परिसरात आपल्याला घर खरेदीची सुवर्णसंधी आहे. सिडकोकडून लवकरच एक बंपर लॉटरी जाहीर करण्यात येणार असून या लॉटरीत तब्बल 22000 घरांचा समावेश असणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर ही लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
किमती कमी करण्याची मागणी
सर्वसामान्यांना परवडणारी घरं म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून दिली जातात. मात्र, सिडकोच्या घरांचे सध्याचे दर हे जास्त असून घरांच्या किमती आणखी कमी करण्याची मागणी सातत्याने होत असते. याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू असून या किमती येत्या काळात कमी होण्याची अपेक्षा आहे, असे विजय सिंघल यांनी म्हटलंय.
advertisement
दरम्यान, सिडको घरांच्या किमती आणि इतर कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत विविध लॉटरीतील अनेक घरांची विक्रीच झालेली नाही. अनेक घरे विक्री न झाल्याने पडून आहेत. ही घरे आणि आता बांधकाम पूर्ण होत आलेली घरे यांची जम्बो लॉटरी काढण्याची तयारी सिडकोकडून सुरू आहे.
घरांचे लोकेशन काय?
सिडकोच्या जम्बो लॉटरीतील घरे ही नवी मुंबईतील विविध नोडमध्ये उपलब्ध असतील. यामध्ये नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, खारघर आणि पनवेलमधील तळोजा, द्रोणगिरी या नोडचा समावेश असेल. लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून घरांच्या किमती आणि इतर माहितीसाठी वाट पाहावी लागेल.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 18, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
CIDCO Lottery 2025: नवी मुंबईत घ्या स्वस्तातलं घर, 22000 घरांची जम्बो लॉटरी, सोडत कधी?