प्रशांत महासागरात होणार मोठी हालचाल, भारतात हाडं गोठवणारी थंडी वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, ला नीना संकटामुळे यंदा दिवाळीपर्यंत पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी राहण्याची शक्यता Skymet Weather आणि अमेरिकी राष्ट्रीय हवामान सेवेने वर्तवली.
मुंबई: आतापर्यंत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात व्हायला हवी होती, मात्र मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. महाराष्ट्रात मागच्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढचे 48 तास महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम राहणार आहे. यंदा मान्सून लवकर आला, इतकंच नाही तर मान्सून उशिरापर्यंत राहिला, दिवाळीपर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे. पाऊस प्रमाणापेक्षा जास्त झाला आहे. आता यंदा थंडी आणि उकाडा देखील जास्त राहण्याची शक्यता आहे.
यंदा ला नीनाचं संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. त्याचा परिणाम थंडी आणि उकाड्यावर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये यंदा दरवर्षीपेक्षा यंदा जास्त थंडी राहण्याची शक्यता आहे. हाडं गोठवणारी थंडी यंदा महाराष्ट्रात राहू शकते. अमेरिकी राष्ट्रीय हवामान सेवेच्या जलवायू पूर्वानुमान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार ला नीना विकसित होण्याचे चान्सेस 71 टक्के आहेत. डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये त्याचा प्रभाव अधिक जास्त दिसून येईल. त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
ला नीनामुळे भूमध्यरेखीय प्रशांत महासागरातील वातावरणात मोठा बदल होतो. त्यामुळे समुद्राचं आणि त्यावरुन वाहणाऱ्या वाऱ्यांचं तापमानही बदलतं. त्याचा परिणाम जगभरात होत असतो. भारतात या वाऱ्यांमुळे थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला नीना 50 टक्के विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात जास्त थंडी आणि सर्वात जास्त उष्णता यावेळी असणार अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
advertisement
स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जीपी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार आपण ला नीनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशांत महासागरातून आधीच सामान्य ते थंड वारे वाहतात. ला नीना सध्या जरी सक्रिय झालं नसलं तरी जर समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान -0.5 डिग्रीहून कमी झालं तर ते तापमान पुढचे दोन ते तीन महिन्यांपर्यंत तसंच राहण्याची शक्यता आहे. असं झालं तर ला नीनाचा इफेक्ट म्हणू शकतो. 2024 अखेरीस ला नीनाची स्थिती तयार झाली होती. मात्र दीर्घकाळ राहिली नाही.
advertisement
शर्मा म्हणाले की, पॅसिफिक महासागरात सुरू असलेली थंडी जागतिक हवामानावर परिणाम करू शकते. जर ला निना आलं तर अमेरिका आधीच कोरड्या हिवाळ्यासाठी सतर्क आहे, असे ते म्हणाले. भारतात, थंड पॅसिफिक पाण्यामुळे सामान्यतः अधिक कडक हिवाळा येतो आणि विशेषतः उत्तरेकडील आणि हिमालयीन प्रदेशात हिमवर्षाव होण्याची शक्यता जास्त असते. यंदा हिमवृष्टीही लवकर होणार का असाही प्रश्न पडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 2:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रशांत महासागरात होणार मोठी हालचाल, भारतात हाडं गोठवणारी थंडी वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती?