pmpml Bus : पुण्यातील प्रवास आता सोपा होणार! शहरातील 'या' ठिकाणी सुरु होणार बससेवा; असे असतील थांबे

Last Updated:

New Bus Service : पुणे शहरात नागरिकांच्या प्रवासाला सुलभता आणण्यासाठी पीएमपीएमएलने नवीन बससेवा सुरू केली आहे. ही बससेवा दांगट पाटील नगरपासून डेक्कन जिमखानापर्यंत प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.

News18
News18
पुणे : पुणे महानगर प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या अर्थात पीएमपीएमएलच्या पुढाकारातून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता आणण्यासाठी नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. दांगट पाटील नगर ते डेक्कन जिमखाना या मार्गावर सुरू झालेली ही सेवा नागरिकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. या सुविधेची यशस्वी अंमलबजावणी सचिन विष्णू दांगट यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे.
कोणत्या थांब्याचा समावेश?
नव्या बसमार्गात स्नेहा विहार (दांगट पाटील नगर), दांगट इस्टेट, खान वस्ती, वारजे चौक, कर्वेनगर, एस.एन.डी.टी. आणि डेक्कन जिमखाना या प्रमुख स्थानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन गंतव्यस्थानापर्यंत आरामदायक आणि वेळेवर प्रवास करता येणार आहे.
ही बस सेवा प्रभागातील विविध प्रवासी गटांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतहा ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दैनंदिन ऑफिसमध्ये जाणारे कर्मचारी यांना या सुविधेचा मोठा लाभ मिळणार आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक प्रणाली अधिक सुलभ, सुरक्षित आणि परवडणारी होण्यास मदत होणार आहे.
advertisement
पुणेकरांना प्रवासासाठी पर्यायी आणि विश्वसनीय साधन उपलब्ध करून देणे हे पीएमपीएमएलचे मुख्य उद्दिष्ट असून या नव्या मार्गामुळे नागरिकांना वैयक्तिक वाहनांच्या गरजेची कमी भासणार आहे. परिणामी शहरातील वाहतूक आणि रस्त्यावरील दाटी यामध्ये काही प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
नव्या बस मार्गाची सुरूवात होऊन नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. प्रवाशांना वेळेवर बस मिळण्याची सुविधा असल्याने दैनंदिन प्रवास अधिक सोपा, जलद आणि आरामदायक होणार आहे. याशिवाय नागरिकांच्या मागण्यांवर लक्ष देऊन अशा नव्या बससेवांचा विस्तार भविष्यात करता येईल अशी अपेक्षा आहे.
advertisement
या नव्या बसमार्गामुळे पुणे महानगरातील सार्वजनिक वाहतूक अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक बनण्यास मदत होईल. नागरिकांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सोयीस्कर प्रवासाची ही एक मोठी पाऊलवाट ठरणार आहे.
मराठी बातम्या/पुणे/
pmpml Bus : पुण्यातील प्रवास आता सोपा होणार! शहरातील 'या' ठिकाणी सुरु होणार बससेवा; असे असतील थांबे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement