Vastu Tips: घराच्या नैऋत्य दिशेला असू नयेत या गोष्टी; मोठ-मोठे श्रीमंतीतून अधोगतीला लागतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण-पश्चिम यांच्या मध्ये असलेला कोपरा किंवा दिशेला नैऋत्य कोन म्हटले जाते. या दिशेचा संबंध क्रूर ग्रह राहू आणि केतूशी आहे. हे दोन्ही ग्रह नैऋत्य कोपऱ्याचे स्वामी मानले जातात. त्यामुळे या..
मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये घराच्या प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व दिले आहे. जर तुम्ही या दिशांशी संबंधित नियमांचे पालन केले, तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. मात्र, काही चुका केल्यास घरात नकारात्मकता आणि अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आज आपण नैऋत्य कोन किंवा नैऋत्य दिशेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, या दिशेचे वास्तुशास्त्र समजून घेऊया.
नैऋत्य आणि त्याचे महत्त्व - वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण-पश्चिम यांच्या मध्ये असलेला कोपरा किंवा दिशेला नैऋत्य कोन म्हटले जाते. या दिशेचा संबंध क्रूर ग्रह राहू आणि केतूशी आहे. हे दोन्ही ग्रह नैऋत्य कोपऱ्याचे स्वामी मानले जातात. त्यामुळे या दिशेमध्ये केलेली छोटीशी चूकही तुमच्यासाठी मोठे नुकसान आणू शकते.
नैऋत्य दिशेबाबत या चुका करू नयेत -
advertisement
मंदिर किंवा पूजाघराची स्थापना करू नका: नैऋत्य कोनात चुकूनही देव्हारा किंवा पूजाघर बनवू नका. या दिशेला देव्हारा असल्यास मानसिक तणाव वाढतो आणि घरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. देवी-देवतांची स्थापना या दिशेला केल्यास आर्थिक नुकसानही होऊ शकते.
पाण्याचा स्रोत नको: या दिशेला पाण्याची टाकी, विहीर किंवा पाण्याचा कोणताही स्रोत नसावा. नैऋत्य कोनात पाण्याचे स्थान असणे वास्तुदोष निर्माण करते. यामुळे घरात सतत अडचणी येतात आणि आर्थिक नुकसान होते.
advertisement
स्वयंपाकघर नसावे: या दिशेत स्वयंपाकघर बनवणे चांगले मानले जात नाही. नैऋत्य कोनात असलेले स्वयंपाकघर घरातील लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. त्यामुळे अशा घरात आनंदाची आणि सुखाची नेहमीच कमतरता जाणवते.
अंधार ठेवू नका: हा कोपरा नेहमी प्रकाशित आणि स्वच्छ ठेवा. जर या दिशेत जास्त अंधार असेल, तर त्यानं आपल्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.
advertisement
नैऋत्य कोनात काय असावे - नैऋत्य कोनात तुम्ही जड वस्तू, जसे की कपाटे, फर्निचर किंवा इतर जड सामान ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार, जड सामान या दिशेत ठेवणे योग्य मानले जाते, ज्यामुळे घरात स्थिरता येते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घराच्या नैऋत्य दिशेला असू नयेत या गोष्टी; मोठ-मोठे श्रीमंतीतून अधोगतीला लागतात