अखेर ते दिवस आलेच! नवरात्रीत 2 राजयोग, या राशींचे लोक अचानक होणार मालामाल
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : गणेशोत्सवानंतर आता संपूर्ण देशात भक्तांमध्ये नवरात्रीची आतुरता आहे. देवीच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून, या वर्षीची शारदीय नवरात्र अधिक खास ठरणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवानंतर आता संपूर्ण देशात भक्तांमध्ये नवरात्रीची आतुरता आहे. देवीच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरू झाली असून, या वर्षीची शारदीय नवरात्र अधिक खास ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये नवरात्र केवळ नऊच नव्हे तर दहा दिवसांची असेल. त्याचबरोबर, या काळात एक दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहयोग महालक्ष्मी राजयोग निर्माण होत असून, काही राशींसाठी हा सण भाग्य बदलणारा ठरणार आहे.
advertisement
यंदा नवरात्र 10 दिवसांची असणार
साधारणपणे नवरात्र नऊ दिवसांची असते, मात्र यंदा पंचांगानुसार तृतीया तिथी अधिक आल्यामुळे नवरात्र 10 दिवस चालणार आहे. 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6:09 ते 8:06 या वेळेत घटस्थापना केली जाईल. जर भक्तांना दुपारी घटस्थापना करायची असेल, तर सकाळी 11:49 ते 12:38 या अभिजीत मुहूर्तात ती करणे सर्वोत्तम मानले गेले आहे. या काळात केलेली पूजा विशेष फलदायी ठरणार आहे. विजयादशमी 2 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल.
advertisement
महालक्ष्मी राजयोगाचे आगमन
नवरात्रात 24 सप्टेंबर रोजी एक महत्त्वाचा ग्रहयोग घडणार आहे. या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करेल, जिथे आधीच मंगळ उपस्थित आहे. जेव्हा चंद्र (धनाचा कारक) आणि मंगळ (धैर्य व ऊर्जा कारक) एकत्र येतात, तेव्हा महालक्ष्मी राजयोग तयार होतो. हा योग धन, यश आणि समृद्धीचे दरवाजे उघडतो.
advertisement
या तीन राशींना होणार जास्त फायदा
तूळ : तुमच्या राशीतच हा योग तयार होत असल्याने तुम्हाला सर्वाधिक लाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरीत बढती व पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसायात नवे करार मिळतील आणि नफा वाढेल. कौटुंबिक व वैयक्तिक नातेसंबंधातही सौहार्द वाढेल.
मकर : मकर राशीसाठी हा योग करिअर आणि प्रगतीच्या दृष्टीने शुभ आहे. मेहनतीचे फळ मिळेल, वरिष्ठांचा सन्मान वाढेल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल, भविष्यात चांगले परतावे मिळतील.
advertisement
कुंभ : कुंभ राशींसाठी हा योग भाग्याच्या घरात होत असल्याने दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढल्यामुळे कठीण आव्हानेही सहज पेलता येतील.
नवरात्रात आणखी एक शुभ योग
नवरात्रात रवी योग देखील तयार होत आहे. हा योग विशेषतः खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी सोने-चांदी, घर, जमीन किंवा वाहन खरेदी केल्यास दीर्घकाळासाठी समृद्धी येते. सूर्य आणि चंद्र विशिष्ट नक्षत्रस्थितीत असताना हा योग निर्माण होतो, जो शुभ फलप्राप्तीसाठी ओळखला जातो.
advertisement
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 18, 2025 1:57 PM IST