OTT Movie: शेतकऱ्याची लव्हस्टोरी ठरली सुपरहिट, ओटीटीवर मारली बाजी; Highest रेटिंग मूव्ही

Last Updated:

OTT Movie:मनोरंजनाच्या दुनियेत असे काही चित्रपट असतात जे त्यांच्या साधेपणाने आणि हृदयाला भिडणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकतात. अलीकडेच प्रदर्शित झालेला एक चित्रपट सध्या चर्चेत आहे.

शेतकऱ्याची लव्हस्टोरी ठरली सुपरहिट
शेतकऱ्याची लव्हस्टोरी ठरली सुपरहिट
मुंबई : मनोरंजनाच्या दुनियेत असे काही चित्रपट असतात जे त्यांच्या साधेपणाने आणि हृदयाला भिडणाऱ्या कथानकाने प्रेक्षकांची मने जिंकतात. अलीकडेच प्रदर्शित झालेला एक चित्रपट सध्या चर्चेत आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीतच या चित्रपटाने प्रेक्षकांची दाद मिळवली. ओटीटीवर चर्चेत असलेल्या या सिनेमाविषयी जाणून घेऊया.
कथा, अभिनय, संगीत आणि छायांकनामुळे समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाला मान्यता मिळाली असून आयएमडीबीवर तब्बल 9.1 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे या वर्षातील टॉप रेटेड चित्रपटांपैकी हा एक ठरला आहे.
हा चित्रपट म्हणजे तेलुगू रोमँटिक ड्रामा "कन्याकुमारी". गेल्या महिन्यात, 27 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता तो ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक आता Amazon Prime Video या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहू शकतात.
advertisement
कथेबद्दल बोलायचे झाल्यास, यात दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्तींची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तिरुप्ती (श्रीचरण राचकोंडा) हा गावातील शेतकरी आहे. साधे जीवन जगणारा तिरुप्ती कन्याकुमारीच्या प्रेमात पडतो. तर दुसरीकडे, कन्याकुमारी (गीता सैनी) ही महत्त्वाकांक्षी मुलगी आहे. तिला सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे स्वप्न आहे. पण घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे ती कपड्यांच्या दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करू लागते.
advertisement
कथा पुढे सरकत असताना दोघांच्या जगातील फरक स्पष्ट होतो. मात्र प्रेम त्यांना एकत्र आणते. चित्रपटात दाखवले आहे की जीवनातील अडचणी, सामाजिक अडथळे आणि स्वप्नांचा संघर्ष असूनही नातं टिकवता येतं. या कथेत केवळ रोमान्स नाही, तर आयुष्याचा वास्तववादी पैलूही दाखवला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सृजन अट्टाडा यांनी केले आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, खऱ्यासारखे वाटणारे संवाद, आणि भावनिक नाट्य यामुळे चित्रपट प्रेक्षकांना जोडून ठेवतो. कलाकारांचा सहज अभिनय आणि छायांकन हे चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Movie: शेतकऱ्याची लव्हस्टोरी ठरली सुपरहिट, ओटीटीवर मारली बाजी; Highest रेटिंग मूव्ही
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement