रात्री 8:08 ते 9:08 या वेळेचे महत्त्व
आज रात्रीचा हा 1 तास 'अमृत काळ' आणि 'शुभ' चौघडियाच्या प्रभावाखाली आहे. चैत्र पौर्णिमेचा चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याचे किरण पृथ्वीवर सकारात्मकतेचा वर्षाव करतात. आज 'रवि योग' आणि 'सर्वार्थ सिद्धी योग' देखील जुळून आले आहेत. रात्री 8 ते 9 या काळात चंद्राची ऊर्जा सर्वोच्च स्तरावर असते. या एका तासात केलेली साधना किंवा उपाय इतर वेळेपेक्षा 10 पट अधिक वेगाने फळ देतात, अशी मान्यता आहे. ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे किंवा ज्यांना मानसिक तणाव जाणवतो, त्यांच्यासाठी ही वेळ 'अमृत' समान आहे.
advertisement
आयुष्यातील समस्या दूर करणारा 'खास उपाय'
जर तुम्हाला पैशांची चणचण भासत असेल किंवा कामात यश मिळत नसेल, तर आज रात्री 8:08 ते 9:08 या दरम्यान हा उपाय करा. एक तांब्याचा किंवा चांदीचा कलश घ्या, पाणी, थोडे कच्चे दूध आणि पांढरी फुले घ्या. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये जिथे चंद्रप्रकाश पडेल तिथे उभे राहा. चंद्राला पाहत दुधमिश्रित पांढऱ्या पाण्याचे 'अर्घ्य' अर्पण करा. अर्घ्य देताना "ॐ सों सोमाय नमः" किंवा "ॐ श्रां श्रीं श्रौं सः चन्द्रमसे नमः" या मंत्राचा जप करा. अर्घ्य देऊन झाल्यानंतर चंद्राच्या प्रकाशात बसून किमान 11 वेळा 'हनुमान चालीसा' किंवा 'विष्णू सहस्रनामाचा' पाठ करा. यामुळे तुमच्या सभोवतालची नकारात्मकता नष्ट होईल आणि भाग्याची साथ मिळेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
