TRENDING:

भररस्त्यात हत्तीला आला राग, दिसेल ते उचलून फेकू लागला; पाहा VIDEO

Last Updated:

प्राण्यांना राग आल्यावर ते कोणावर हल्ला करतील किंवा गोष्टींची तोडफोड करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे रागावलेले प्राणी खूपच भयंकर आणि धोकादायक असतात. संतापात ते अनेकदा लोकांना हानी पोहचवतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : प्राण्यांना राग आल्यावर ते कोणावर हल्ला करतील किंवा गोष्टींची तोडफोड करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे रागावलेले प्राणी खूपच भयंकर आणि धोकादायक असतात. संतापात ते अनेकदा लोकांना हानी पोहचवतात. असाच एका चिडलेल्या हत्तीचा व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये तो रस्त्यावर जे दिसेल ते उचलून फेकतोय. मात्र काही लोक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतायेत.
advertisement

रस्त्याच्या मधोमध अचानक हत्तीला राग येतो आणि तो जे दिसेल उचलून फेकतो. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ पहायला मिळतो. माहूत मग त्या हत्तीला शांत करण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मॉलमध्ये दुसऱ्याच महिलेसोबत फिरत होता नवरा, पुढे एका बायकोनं जे करायला हवं तेच तिनं केलं

advertisement

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या मधोमध हत्ती गोंधळ घालत आहे. रागावल्यामिळे तो तोडफोड करतोय. त्याचा राग पाहून आजूबाजूचे लोकही घाबरून दूर पळत आहेत. माहूत हत्तीची सोंड ओढत त्याला थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतो मात्र हत्ती काही ऐकतच नाही.

माहूत आणि 4-5 लोक मिळून मग हत्तीला पकडून शांत करण्याचा प्रयत्न करतात. हत्तीच्या पायात साखळ्या असून तो तसाच पळताना दिसत आहे. भरपूर प्रयत्नानंतर ते हत्तीला शांत करण्यात यशस्वी होतात आणि त्याला खायला देतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

ajmal_kl.54 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट येत असून व्हिडीओ इंटरनेटवर लक्ष वेधून घेत आहे. अशा प्राण्यांच्या घटना सतत समोर येत असतात.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
भररस्त्यात हत्तीला आला राग, दिसेल ते उचलून फेकू लागला; पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल