मॉलमध्ये दुसऱ्याच महिलेसोबत फिरत होता नवरा, पुढे एका बायकोनं जे करायला हवं तेच तिनं केलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लग्न झालेलं असतानाही अनेकांचं बाहेर अफेअर असतं. त्यामुळे यावरुन नवरा-बायकोमध्ये भांडण होताना पहायला मिळतात. घरातच नाहीतर हे वाद घराच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी होताना आढळून येतात.
नवी दिल्ली : लग्न झालेलं असतानाही अनेकांचं बाहेर अफेअर असतं. त्यामुळे यावरुन नवरा-बायकोमध्ये भांडण होताना पहायला मिळतात. घरातच नाहीतर हे वाद घराच्या बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी होताना आढळून येतात. ही भांडणं अनेकदा हाणामारीचंही रुप घेतात. अशीच काहीशी घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका महिलेनं आपल्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत मॉलमध्ये फिरताना पाहिलं. मग काय तिथेच वाद सुरु झाला. या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.
महिलेनं आपल्या नवऱ्याला रंगेहाथ पकडलं. तो मॉलमध्ये दुसऱ्याच महिलेसोबत फिरत होता. त्यानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मॉलमध्ये एक महिला नवऱ्याच्या जोरात थोपाडीत ठेवून देते. त्यानंतर ती तेथून रागात निघते आणि जाता जाता त्या दुसऱ्या महिलेचे केस ओढते आणि तिला खाली पाडते.
advertisement
@gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
Extra-Marital affair kalesh (Wife Caught her Hisband with other lady inside Mall) pic.twitter.com/d1jekkE9os
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 29, 2024
advertisement
दरम्यान, नवरा बायकोंच्या भांडणांचे अशा अनेक घटना समोर येत असतात. एकापेक्षा एक विचित्र आणि भयंकर घटना समोर येत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2024 6:12 PM IST
मराठी बातम्या/Viral/
मॉलमध्ये दुसऱ्याच महिलेसोबत फिरत होता नवरा, पुढे एका बायकोनं जे करायला हवं तेच तिनं केलं







