आजीची बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, केला असा डान्स की VIDEO तुफान व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच अनेक हटके अंदाज पहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही.
नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच अनेक हटके अंदाज पहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल सांगता येत नाही. आजीच्या हटके डान्सचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. तुम्हीही आजीचा उत्साह पाहून चकित व्हाल.
आजीचा डान्स व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. बॉलिवूड गाण्यावर आजीला थिरकताना पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. या वयातही आजीचा उत्साह एखाद्या तरुणासारखा आहे. आजीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय.
आजीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरातील व्हिडीओ असून आजीबाई बॉलिवूड गाण्यावर थिरकत आहे. घरातील बाकीचे सदस्य आजीचा डान्स एन्जॉय करताना पहायला मिळत आहे. करण-अर्जुन चित्रपटातील 'गुप-चुप' गाण्यावर आजी डान्स करताना दिसतेय. आजी डान्स खूप एन्जॉय करत असून तिचा उत्साह आणि आनंद नेक्स लेव्हल आहे.
advertisement
advertisement
सहसा या वयात वृद्धांना चालायला, फिरायला ताकद नसते. काहीजण तर अंथरुणाला खिळलेले असतात. मात्र ही आजी धमाकेदार डान्स करतेय. dramebaazchhori99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2024 1:55 PM IST









