TRENDING:

Bank Recruitment 2026: स्पर्धा परीक्षा नाही, थेट जॉब ऑफर! सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा करावा?

Last Updated:

Indbank recruitment 2026 : इंडियन बँकेची सहायक कंपनी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सरकारी बँकेत नोकरी करण्याची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेची सहायक कंपनी इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिस लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमुळे तरुणांना चांगल्या पगाराची आणि स्थिर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
News18
News18
advertisement

'या' पदासाठी केली जाणार भरती

इंडबँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर, डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट, सेक्रेटरिएट ऑफिसर - ट्रेनी (बॅक ऑफिस) आणि स्टॉक ब्रोकिंग टर्मिनल्ससाठी डीलर या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळणार असून इन-हँड सॅलरीही आकर्षक असणार आहे.

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी www.indbankonline.com या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. ही भरती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे हेड अॅडमिनिस्ट्रेशन, पहिला मजला, खिवराज कॉम्प्लेक्स-I, अण्णा सलाई, नंदनम, चेन्नई-35 या पत्त्यावर पाठवायची आहेत.

advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहा?

या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, ही उमेदवारांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2026 असून 21 ते 40 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बिग बॉस मराठीत काळू डॉनची हवा, पण कुटुंबाचं भयाण वास्तव पाहिलं का? Video
सर्व पहा

रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी एमबीए (मार्केटिंग किंवा फायनान्स) आणि किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग स्पेशलिस्ट पदासाठी कॉम्प्युटर सायन्स किंवा व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी आणि 4 ते 5 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. सेक्रेटरिएट ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Bank Recruitment 2026: स्पर्धा परीक्षा नाही, थेट जॉब ऑफर! सरकारी बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा करावा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल