रॉयटर्सनं दिलेल्य वृत्तानुसार, अझरबैजान एअरलाइन्सची फ्लाइट क्रमांक J2-8243 ने अझरबैजानमधील बाकू विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. ते विमान रशियातल्या चेचण्या राज्यातील ग्रोन्जीला निघालं होतं. मात्र पक्षांच्या हल्ल्यामुळे या विमानाचं आपत्कालीन लँडींग करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्राथमिक माहिती समोर आली.
मात्र सध्या रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे युक्रेनकडून प्रति ड्रोनहल्ला होण्याची शक्यता होती, ही बाब लक्षात घेऊन या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. कझाकस्तानच्या अक्ताऊ विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग केलं जाणार होतं. पण तत्पूर्वी विमानाचा अपघात झाला, अशी माहिती इंडिया टुडेनं दिली आहे.
advertisement
ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी विमानातून 67 प्रवासी प्रवास करत होते, यातल्या 38 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 29 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी काही जखमी लोकांनी एकमेकांची मदत करत एकमेकांना वाचवलं आहे. कझाकस्तानचे उपपंतप्रधान कनत बोझुम्बाइव्ह यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
