आई हे देवाचं रूप मानलं जातं; पण एक आई तिच्या मुलांसाठी काळ ठरली. ब्रिटनमधल्या लिसा स्नायडर (वय 41) या महिलेनं तिच्या आठ वर्षांच्या मुलाची आणि चार वर्षांच्या मुलीची कुत्र्याच्या पट्ट्याने हत्या केली. ओवेन सिंडर (वय 22) या तिच्या थोरल्या मुलाने आईचं हे कृत्य जगासमोर आणलं. ओवेन न्यायालयात घटनाक्रम सांगू लागला तेव्हा लिसा माफी मागू लागली. त्या वेळी ओवेन म्हणाला, की 'तू आई असूच शकत नाहीस. मी तुला माझ्या आईच्या रूपात पाहू शकत नाही. तुला आई म्हणायची लाज वाटते.'
advertisement
2019 मध्ये लिसाने पेनसिल्व्हानियातल्या तिच्या घराच्या तळघरात आठ वर्षांचा मुलगा कॉनर आणि चार वर्षांची मुलगी ब्रिनले यांना फाशी दिली. हे दोघं बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते; पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ओवेनेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
ओवेने न्यायालयाला सांगितलं, की लिसाने दोन्ही मुलांना फास लावण्यापूर्वी पाळीव पिटबुल कुत्र्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याचा पुरावा फेसबुक पेजवर फोटोच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हे पाहिल्यावर मी तिचा शोध घेऊन तळघरात पोहोचलो तेव्हा मला लहान बहीण आणि भाऊ तडफडताना दिसले. मी त्यांना फासावरून खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं; पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
'मिरर यूएस'च्या वृत्तानुसार, कोरोनरनं सांगितलं, की लिसाने तिच्या जबाबात अनेक दावे केले. कॉनरला शाळेत त्रास दिला जात होता आणि तो आत्महत्या करण्याची धमकी देत होता, असा दावा तिनं केला; पण मुलांना फाशी देण्यापूर्वी लिसाने जिवे कसं मारायचं याबाबत इंटरनेट सर्फिंग केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. 'आय ऑलमोस्ट गॉट अवे विथ इट' नावाची डॉक्युमेंट्रीदेखील तिनं पाहिली होती. यात मुलांना मारताना दाखवलं गेलंय. मुलाच्या आत्महत्येबाबतच्या दाव्यावर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास केला असता आत्महत्येबाबत कोणताही पुरावा सापडला नाही. कॉनर शारीरिकदृष्ट्या स्वतःला किंवा लहान बहिणीला इजा करण्यास सक्षम नव्हता. ओवेननं सांगितलं की,' कॉनरला शारीरिक मर्यादा होत्या. त्यामुळे तो स्वतः फाशी घेऊ शकत नाही.
