रशियन गुप्तहेर की ट्रम्पचा खास माणूस?
मला जाहीर करताना आनंद होत आहे की, मी सर्जियो गोर यांना भारत प्रजासत्ताकातील आमचे पुढील युनायटेड स्टेट्स राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणून बढती देत आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या प्रदेशासाठी, माझ्याकडे असा कोणीतरी असणे महत्वाचे आहे ज्यावर मी माझा अजेंडा पूर्ण करण्यासाठी आणि अमेरिका पुन्हा महान बनविण्यात मदत करण्यासाठी पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
advertisement
सर्जियो गोर रशियन गुप्तहेर?
सर्जियो गोर यांचे नाव वादांशी जोडले गेले आहे. गोरचा जन्म अझरबैजानमधील ताश्कंद येथे झाला. गोरचे संपूर्ण कुटुंब 1999 मध्ये तिथे स्थलांतरित झाले होते. त्यांच्यावर रशियन गुप्तहेर असल्याचा आरोपही करण्यात आला होता, ज्यासाठी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांना सापही म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन जपान दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान विदेश दौऱ्यावर जाणार आहेत. जापानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या आमंत्रणानंतर पीएम मोदी 15व्या भारत-जापान वार्षिक शिखर सम्मेलनात भाग घेणार आहेत. 29 ते 30 ऑगस्ट दरम्यान जापान दौऱ्यावर असतील. एकीकडे मोदी जपान दौऱ्यावर जात असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या खास माणसाला भारतात पाठवलं आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय मंचावर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे.
दरम्यान, आपल्या व्हाईट हाऊसने अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यात ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे! अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे माझ्या आयुष्यातील सन्मान असेल, असं सर्जियो गोर यांनी म्हटलं आहे.