रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र याचदरम्यान न्यायालयानं आता ट्रम्प यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घातल्यामुळे हा ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमेरिकेच्या घटनात्मक तरतुदीनुसार ट्रम्प यांना राज्यात मतदान करण्यापासून रोखण्यात यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
कोलोरॅडो न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे राज्यघटनेच्या चौदावी घटनादुरुस्ती कलम तीन अंतर्गत राष्ट्राध्यक्ष होण्यास अपात्र आहेत. त्यामुळे ते निवडणूक लढवू शकत नाहीत. एवढंच नाही तर ट्रम्प यांचं नाव रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या मतदान प्रक्रियेतूनही वगळण्यात यावं असे आदेश न्यायालयानं राज्य सचिवांना दिले आहेत.
advertisement
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
December 20, 2023 8:28 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा दणका; निवडणूक लढवण्यास बंदी
