वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या सुरक्षा रक्षक दलाने शुक्रवारी रात्री उत्तर-पूर्व लेबनॉनच्या बेका व्हॅली भागात हल्ला केला. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भागातच हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह लपला होता. गुप्तचर विभागाच्या या इनपुटच्या आधारे इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी थेट हिजबुल्लाच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं अन् यामध्ये हसन नसराल्लाह याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.
कोण होता शेख हसन नसरल्लाह?
शेख हसन नसरल्लाह हा लेबनॉनचा प्रसिद्ध शिया धर्मगुरू आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा नेता होता. 1975 पासून शेख हसन नसरल्लाह दहशतवादी संघटनेत काम करत होता. शेख हसन नसरल्लाह याचे वडील अब्दुल करीम एक छोटेसे दुकान चालवायचे. नसराल्ला नऊ भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात मोठा होता. वयाच्या 32 व्या वर्षी हिजबुल्लाहची कमान हाती घेतली होती.
