TRENDING:

या मुस्लीम देशात आहे लक्ष्मीचा वास, इथे भारतीयांना मिळतो पैसाच पैसा, जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबरपासून कुवेत दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि कुवेत यांच्यात व्यापार व सांस्कृतिक संबंध आहेत. कुवेतमध्ये 10 लाख भारतीय राहत असून, अनेक भारतीय कामगार, डॉक्टर, नर्सेस, आणि अभियंते आहेत. कुवेतमधील भारतीयांना चांगली पगारमान्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबरपासून तेलसंपन्न मध्यपूर्वेतील देश कुवेतच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकमेकांच्या देशाला भेट देऊन पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वाच्या दौऱ्याची तयारी केली आहे. कुवेत हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा देश मानला जातो. येथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात आणि आपली कमाई भारतात पाठवतात.
News18
News18
advertisement

दोन्ही देशांच्या नेत्यांच्या एकमेकांच्या भेटी मर्यादित असल्या तरी दोघांमध्ये मजबूत व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. कुवेतमध्ये तेल सापडण्यापूर्वीही भारत आणि कुवेत यांच्यात सागरी मार्गाने व्यापार होत होता. 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारतीय रुपयाचा वापर केला जात होता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑगस्ट 2024 मध्ये कुवेतला भेट दिली होती, तर कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल याह्या 3-4 डिसेंबर रोजी भारतात आले होते.

advertisement

कुवेत भारतापासून 3300 किलोमीटर अंतरावर आहे. कुवेतची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगारांवर अवलंबून आहे. येथे राहणारे बहुतांश भारतीय मजूर म्हणून काम करतात. या श्रमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. कुवेतमधील भारतीय दूतावासानुसार, येथे सुमारे 10 लाख भारतीय राहतात, जे कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के आहे. एवढेच नाही तर कुवेतच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 30 टक्के भारतीय आहेत.

advertisement

कुवेतमध्ये भारतीयांची लोकसंख्याही 10 लाखांच्या पुढे गेली आहे. 10 लाख भारतीयांपैकी 8.85 लाखांहून अधिक भारतीय तेथे मजूर म्हणून काम करतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कुवेतमधील भारतीय केवळ मजूर म्हणून काम करत नाहीत. कुवेतमध्ये एक हजाराहून अधिक भारतीय डॉक्टर आहेत. 500 दाताचे डाॅक्टर भारतीय आहेत आणि 24 हजारांहून अधिक वर्स भारतीय आहेत. येथे काम करणाऱ्या भारतीयांना 300 ते 1050 डॉलर पगार मिळतो. रिसर्च फर्म वर्कयार्डच्या अहवालानुसार, कुवेत हे जगातील सर्वात स्वस्त ठिकाणांपैकी एक आहे.

advertisement

कुवैती दिनारचे मूल्य भारतीय रुपयांमध्ये 275 रुपये आहे, याचा अर्थ जर तुम्ही दर महिन्याला 100 कुवैती दिनार कमावले तर ही रक्कम रुपये 27500 इतकी येते. कुवेतमधील कुशल कारागिराचा सरासरी पगार दरमहा सुमारे 1,260 कुवैती दिनार (सुमारे 3,47,588.32 रुपये) आहे. कुवेतमधील भारतीयाचा किमान पगार सुमारे 320 कुवैती दिनार (सुमारे 88,276.40 रुपये) प्रति महिना आहे.

advertisement

हे ही वाचा : येथे आहे मुंबईतील सर्वात महागडी जमीन, फक्त रजिस्ट्रीसाठीच लागले 27 कोटी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

हे ही वाचा : पुरुष कमी उंचीच्या मुलींकडे जास्त आकर्षीत का होतात? काय आहे यामागचं सायन्स?

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
या मुस्लीम देशात आहे लक्ष्मीचा वास, इथे भारतीयांना मिळतो पैसाच पैसा, जाणून घ्या सविस्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल