विद्यापीठ प्रशासनाचं स्पष्टीकरण : सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या एका शाखेतील सुरक्षा गार्ड अनोळखी महिलेला अटक करताना दिसत आहेत. विद्यापीठाचे प्रवक्ते अमीर महजोब यांनी एक्सवर सांगितले की, "पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत असे आढळून आले की ही तरुणीला गंभीर मानसिक आजार आहे."
या व्हिडीओवर सोशल मीडियावर उलटसुटल प्रतिक्रिया उमटत आहेत. एक युजर्स म्हणताहेत की, "तरुणीचे हे कृत्य जाणीवपूर्वक ड्रेसकोडला केलेला विरोध आहे." तर एक्स या सोशल मीडियावरील लेई ला या युजर्सची प्रतिक्रिया अशी की, "अधिकांश महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये असणे हे त्यांच्या सर्वात वाईट दुःस्वप्नांपैकी एक आहे... हे अधिकाऱ्यांच्या सक्तीच्या हिजाबवरची प्रतिक्रिया आहे. महिलेचे भवितव्य अज्ञात आहे."
Daily Hamshahri ने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, "या कृत्य गंभीर आहे. त्याचा थेट संबंध मानसिक समस्येशी आहे. तिची योग्य ती तपासणीकरून रुग्णालयात हलवले जाईल." सप्टेंबर 2022मध्ये हिजाब नियम भंग केल्याप्रकरणी तरुण इराणी कुर्द महिलेच्या मृत्यूनंतर देशव्यापी निदर्शनं झाली होती. तेव्हा मोठ्या संख्येने महिलांनी आपला हिजाब काढून अधिकाऱ्यांना आव्हान दिले आहे. सुरक्षा दलांनी हिंसाचार करून बंड मोडून टाकले होते.
