TRENDING:

University Of Zihad : पाकिस्तानमध्ये रमजानपूर्वी भीषण बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृ्त्यू, अनेक जण जखमी

Last Updated:

पाकिस्तानमध्ये रमजानची तयारी सूरू असताना भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यात 5 जणांचा मृ्त्यू झाला आहे,तर अनेक जण गंभीररीत्या जखमी आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
University Of Zihad : पाकिस्तानमध्ये रमजानची तयारी सूरू असताना भीषण बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यात 5 जणांचा मृ्त्यू झाला आहे,तर अनेक जण गंभीररीत्या जखमी आहेत. या घटनेनंतर पाकिस्तानी नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
pakistan bomb blast
pakistan bomb blast
advertisement

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमेकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अकोरा खटख येथील मशिदीवर शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाच नमाजींचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहे.

दरम्यान हा स्फोट अशा वेळी झाला आहे, जेव्हा पाकिस्तानसह संपूर्ण मुस्लिम समाज रमजानच्या तयारीत व्यस्त आहे. इस्लामी कॅलेंडरनुसार, रमजान महिन्याची सुरुवात शनिवार किंवा रविवारपासून होण्याची शक्यता आहे, जे चंद्रदर्शनावर अवलंबून असेल.त्यामुळे रमजानपु्र्वी नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे.

advertisement

या हल्ल्यावर जिल्हा पोलिस प्रमुख अब्दुल राशिद यांनी सांगितले की, स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान अद्याप तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

‘युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद’ म्हणून ओळखली जाते

जामिया हक्कानिया ही संस्था तिच्या कठोर इस्लामिक शिक्षण आणि तालिबानी विचारसरणीसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 4,000 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास आणि अन्न पुरवले जाते. या संस्थेने तालिबानसाठी अनेक लढणारे सदस्य तयार केले आहेत, त्यामुळे ती ‘युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद’ म्हणून ओळखले जाते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील मशिदी आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली आहे. विशेषतः रमजान महिन्यात कोणत्याही संभाव्य हल्ल्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
University Of Zihad : पाकिस्तानमध्ये रमजानपूर्वी भीषण बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृ्त्यू, अनेक जण जखमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल