त्यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तान सध्या आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानवर आयएमएफ, वर्ल्ड बँकेसह अनेक संस्थांचा दबाव आहे. त्यामुळे पाकिस्तान दाऊद इब्राहिमला मारू देखील शकते असा दावा आरजू काजिमी यांनी केला आहे.
पुढे बोलताना काजमी म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये आतापर्यंत अशाप्रकारे अनेक दहशतवाद्यांना मारण्यात आले आहे. मात्र आता लोकांमधून असा प्रश्न उपस्थित होत आहे की, अशाप्रकारच्या दहशतवादी संघटना चालवणाऱ्या प्रमुखांना कधी मारलं जाणार? पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनने देखील याबाबत पाकिस्तानवर दबाव टाकला आहे. पाकिस्तानमध्ये अशाप्रकारचे लोक नकोत असं चीनचं म्हणणं आहे. त्यामुळे पाकिस्ताननेच दाऊदला संपवल्याची शक्यता आहे.
advertisement
दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये राहातो असं पाकिस्तान सरकारने अजूनपर्यंत कधीही अधिकृतरित्या सांगितलेलं नाहीये. कारण त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आता जर दाऊदला मारलं असेल किंवा एखाद्या आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तर ही गोष्टी पाकिस्तान जगासमोर कधीच येऊ देणार नाही असंही काजिमी यांनी म्हटलं आहे.
