मॉस्कोमधील गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांनी यापूर्वी TASS ला सांगितलं होतं की, ही लस ट्यूमरची वाढ रोखू शकते आणि कर्करोगाचा प्रसार रोखू शकते. पण यामुळे ही लस सर्वसामान्य लोकांना दिली जाणार नाही. केवळ कर्करोग झालेल्या रुग्णांच्या उपचासाठी या लसीचा वापर केला जाणार आहे. ही लस प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाच्या रुग्णांना दिली जाऊ शकते.
advertisement
इतर देशांमध्येही कर्करोगावरील लस विकसित करण्याची स्पर्धा
रशियन नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि गामालेया नॅशनल रिसर्च सेंटरसह रशियन आरोग्य मंत्रालयाने या लसीबाबत पुष्टी केली आहे. तसेच लस कशी कार्य करते, हेही स्पष्ट केलं आहे. मात्र ही लस कोणत्या कर्करोगावर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा या लसीला काय म्हटलं जाईल, याबाबत अजून कोणतीही स्पष्टता आली नाही.
यापूर्वीही अशा लसी तयार करण्यात आल्यात
2023 मध्ये यू.के सरकारने वैयक्तिक कर्करोग उपचार विकसित करण्यासाठी जर्मन जैवतंत्रज्ञान कंपनीशी करार केला होता. याशिवाय मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या सध्या त्वचेच्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत. आधीच बाजारात अशा लसी आहेत, ज्यांचे लक्ष्य कर्करोगास प्रतिबंध करणे आहे.
