सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी खास पद्धतीने नाताळ साजरा केला. सांता हॅट्स आणि इतर ख्रिसमस सजावट परिधान केलेल्या या अंतराळवीरांचे फोटो अलीकडेच समोर आले. नासाने याचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. सुनिता विल्यम्सला पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मात्र, व्हिडीओ समोर आल्यानंतर नासाला स्पष्टीकरण द्यावं लागलंय.
दोन्ही आंतराळवीरांकडे कॅप आणि ख्रिसमसचं साहित्य कुठून आलं? दोघांचा तिथंच ठेवण्याचा आधीपासून प्लॅन होता का? फक्त 8 दिवसासाठी गेलेल्या आंतराळवीरांकडे इतकं साहित्य कसं काय आलं? हा सर्व प्री प्लॅन असल्याचा आरोप केला जात होता. त्यावर नासाने स्पष्टीकरण दिलं आहे.
advertisement
नासाने हे आरोप फेटाळून लावले आणि स्पष्ट केलं की, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला पाठवलेल्या ताज्या वस्तूंच्या वितरणात ख्रिसमस सजावट, विशेष भेटवस्तू आणि सणाच्या जेवणाचा समावेश होता. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस स्पेस एक्सद्वारे हे साहित्य पाठवण्यात आलं होतं, असं नासाने म्हटलं आहे. अंतराळवीरांना पाठवलेल्या पॅकेजमध्ये हॅम, टर्की, भाज्या, पाई आणि कुकीज सारख्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता. याशिवाय सांता टोपी आणि लहान ख्रिसमस ट्रीही पाठवण्यात आलं.
दरम्यान, मला ख्रिसमसची साजरा करणं, त्याची तयारी करणं आणि कुटुंबासोबत सुट्टी साजरी करणं आवडतं, असं सुनीता विल्यम्सने म्हटलं आहे. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलद्वारे सुनीता आणि तिच्या टीमला साहित्य पाठण्यात आल्याचं नासाने स्पष्ट केल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
