घटनास्थळी बाचाव कार्य सुरू आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या परिसरात असलेल्या सर्व रुग्णालयातील यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. दरम्यान ट्रेनचे दहा डबे रुळावरून घसरल्यानं अद्यापही मृतांचा संपूर्ण आकडा समोर येऊ शकलेला नाही असा दावा स्थानिक वृत्तवाहिन्यांकडून केला जात आहे. या भागातील सर्व वाहतूक रद्द करण्यात आली आहे.
advertisement
या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही ट्रेन या वर्षाच्या सुरुवातीलाच एका भीषण अपघातामधून थोड्यक्यात बचावल्याची माहिती देखील समोर येत आहे. मात्र आज या ट्रेनचा अपघात झाला आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
August 06, 2023 4:23 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Pakistan train accident : पाकिस्तानात ट्रेनचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू , 50 जखमी
