विविध मीडिया वृत्तानुसार, आरोपी चालकाने ट्रकमधून खाली उतरताच जमावावर गोळीबार सुरू केला. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर दिसत आहेत आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. जखमी लोक रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यात अनेक लोकांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, न्यू ऑर्लिन्स पोलिसांनी देखील संशयितावर गोळीबार केला. ज्यात चालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
अपघात आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, घटनास्थळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून इतर संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या ट्रकने हा अपघात घडला, त्या ट्रकवर इसिसचा झेंडा लावलेला होता. त्यामुळे या प्रकरणात इसिस कनेक्शन असून हा दहशतवादी हल्ला असल्याचं मानलं जात आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
या घटनेची अधिक माहिती देताना न्यू ऑर्लीन्स पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की "प्राथमिक माहितीनुसार, एका वाहनाने गर्दीत घुसून लोकांना धडक दिली, अशी माहिती समोर आली होती. पण आता हा दहशवादी हल्ला असल्याचं समोर येत आहे. काही लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली गेली आहे. घटनेचा तपास सुरू आहे. सध्या या भागात जाणं टाळण्याचं आवाहन केले आहे. संशयिताच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
