काय आहे परंपरा?
मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा सुमारे हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, अस जाणकार सांगतात . संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम,संत नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. परंतु संत एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या झोतात आणले. आपल्या शत्रुच्या गोटातून बातम्या मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी देखील वासुदेवांचा योग्य वापर करुन स्वराज्याच्या अनेक मोहीमा आखल्या होत्या. इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेले वासूदेव आता लुप्त होत आहेत.
advertisement
तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी झटणारा मुंबईकर, 18 वर्षांपासून करतोय अभिमानास्पद काम
आळंदीत राहणारे ज्ञानेश्वर साळुंखे, रोज सकाळी दान पावलं ! म्हणतं दारोदारी भिक्षा मागण्याचा काम ते करतात . घरी आई वडील ,बायको,2 मुलं असं कुटुंब असून ज्ञानेश्वर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वासुदेव दानातून करतात . सकाळी लवकर बाहेर पडून दारोदारी दान पावलं ! असं म्हणत दान गोळा करतात. मी ही परंपरा स्वीकारली असली तरीही माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं असं त्यांनी म्हटलंय.
परंपरा सुरू रहावी पण...
'वासुदेवाची परंपरा आमच्या अनेक पिढ्यांनी आजतागायत सांभाळली आहे. आमचा समाज पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात आढळत असून समाजातील नव्या पिढय़ांनी नवीन व्यवसाय स्वीकारले आहेत. या समाजातील नव्या पिढीला दारोदार फिरून दान मागण्याची लाज वाटते. आता पूर्वीसारखे दानही मिळत नाही. त्यामुळे या परंपरा नष्ट होऊ लागल्या आहेत. या लोकपरंपरांचे जतन होणे आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं.
कारगिलचे जवान पाहतायेत रोहितची वाट; 17 वर्षांपासूनचं व्रत, कधीही पाहिला नसेल असा रक्षाबंधनाचा सोहळा!
आज जे काही जुन्या पिढीतील काही मोजके लोक आहेत. त्यांना दारोदारी न फिरू देता, राज्याच्या लोककला संस्कृती मंत्रालयानं त्यांच्याकडील मौल्यवान ज्ञान कसे जतन होईल, याचा प्रयत्न करावा. त्यांना आर्थिक आधार द्यावा. त्यांच्याकडील ज्ञान नव्या पिढीला मिळेल यासाठी प्रयत्न करावा, अशी भावना सर्वसामान्य वासुदेवांची आहे.