याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एआयमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. त्याच्या मदतीने आता कुणाचाही फोटो अत्यंत अचूकपणे रिप्लेस करता येतो. विविध एआय टूल्सच्या मदतीने एकाचा चेहरा दुसऱ्याच्या शरीरावर लावणे, बनावट फोटो तयार करणे किंवा अश्लील स्वरूपात फोटो मॉडिफाय करणं सहज शक्य झालं आहे. असे बदल केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यास संबंधित व्यक्तीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो.
advertisement
Thane Crime: कुख्यात शिकलकर टोळीचे 4 सदस्य अटक, कल्याण गुन्हे शाखेला मोठं यश! 39 लाख जप्त
एआय ट्रेंडसोबतच सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वाढलं आहे. फोटोच्या सहाय्याने फसवणूक, ब्लॅकमेलिंग किंवा बदनामी करण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सायबर गुन्हेगार फेक अॅप्स आणि वेबसाइटच्या माध्यमातून युझर्सची खासगी माहिती तसेच फोटोंचा गैरवापर करत आहेत. काही गुन्हेगार तरुणींच्या आणि महिलांच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील फोटो किंवा व्हिडीओही देखील तयार करत आहेत. त्यामुळे एआय ट्रेंडसाठी आपले फोटो वापरताना विचार करावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
काय काळजी घ्यावी?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतंही अॅप वापरण्यापूर्वी युजर्सचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासली पाहिजे. एखादी वेबसाइट उघडल्यानंतर, फेक वेबसाइटवर रिडिरेक्ट होऊ नये यासाठी युआरएल काळजीपूर्वक तपासली पाहिजे. कधीही संवेदनशील किंवा वैयक्तिक फोटो अपलोड करू नयेत. डोळे झाकून कोणताही सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करू नये.