TRENDING:

MHADA Lottery : पैशाची बॅग भरून ठेवा, म्हाडाची बंपर लॉटरी; मुंबईत 2500 घर; पाहा संपूर्ण माहिती

Last Updated:

Mumbai Mhada Lottery 2026 : मुंबईकरांनो आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हाडा येत्या काही दिवसांत घरांची सोडत काढणार आहे. जाणून घ्या या विषयीची संपूर्ण माहिती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : म्हाडाच्या लॉटरीची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. म्हाडाची बहुप्रतितिक्षित मुंबई मंडळ सोडतीची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार ते समोर आल असून म्हाडा तब्बल 2 हजार 500 घरांसाठी सोडत ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणार आहे. मात्र ही घरांची ही सोडत सर्वसामान्यांना चांगलीच महागात पडणार असून निराशा पडणार आहे.
मुंबईत २५०० घरांसाठी म्हाडाची लॉटरी
मुंबईत २५०० घरांसाठी म्हाडाची लॉटरी
advertisement

म्हाडाची लॉटरी आली रे

म्हाडाने 2023 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सोडत काढलेली होती. त्यानंतर थेट 2024 साली जी सोडत मुंबई मंडळाने काढली होती त्यामध्ये अत्यल्प आणि अल्प उत्पन्न घरांच्या किंमती प्रचंड होत्या, त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले होते.

2025 या वर्षात म्हाडाने सोडत काढलेली नव्हती. पण गेल्या काही सोडतींतील शिल्लक घरे सध्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेद्वारे विकली जात. यात घर मिळण्याची शक्यता होती तरी त्याची रक्कम मोठी आणि कोट्यवधींच्या किंमती यांमुळे सर्वसामान्यांना ही घर घेण्यास वाव राहिलेला नाही.

advertisement

यावर्षी 5 हजार घरांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाने गेल्या वर्षीच केली होती; मात्र पत्राचाळीतील 2 हजार 500 घरांचे बांधकाम न झाल्याने ही घरे सोडतीतून वगळावी लागली होती. पण आता केळव 2 हजार 500 घरांची सोडत एप्रिल महिन्यात काढली जाणार आहे. मात्र यात अत्यल्प गटासाठी मुबलक घरे आहेत. अल्प गटासाठी घरांच्या किंमतीही कोट्यवधींमध्ये आहे. त्यामुळेच म्हाडाची ही सोडत मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असेल.

advertisement

कुठे किती घरे अन् अंदाजे किमती?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उसळी, कांद्याने केली आजही निराशा, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा लॉटरी 2026 अंतर्गत मुंबईच्या अनेक भागांमध्ये उत्पन्न गटानुसार घरांचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. ज्यात गोरेगाव पत्राचाळ येथे अल्प उत्पन्न गटासाठी 85 घरे असून किंमत सुमारे 1.03 कोटी असणार आहे त्यानंतर मुलुंड,चेंबूरमध्येही अल्प गटासाठी मर्यादित घरे असणार आहेत आणि मध्यम गटासाठी विक्रोळी कन्नमवारनगरमध्ये 1221 घरे उपलब्ध आहेत. अंधेरी, शीव येथेही काही घरे राखीव आहेत. उच्च गटासाठी बोरिवली आणि पवई येथे महागडी घरे उपलब्ध असून किंमत दीड कोटींपासून 2.5 कोटींपर्यंत आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
MHADA Lottery : पैशाची बॅग भरून ठेवा, म्हाडाची बंपर लॉटरी; मुंबईत 2500 घर; पाहा संपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल