TRENDING:

Kalyan- Kasara Route: कल्याण- कसारा रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार, प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट

Last Updated:

Kalyan- Kasara Railway 4th Line: कल्याण- कर्जत मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामानंतर आता आसनगाव- कसारा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई- नाशिक दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकराकडून मंजुरी मिळाली आहे. कल्याण- कर्जत मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामानंतर आता आसनगाव- कसारा दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उपनगरीय लोकल, मेल- एक्सप्रेस तसेच मालगाड्यांसाठी स्वतंत्र आणि सुरळीत कॉरिडॉर उपलब्ध होणार आहे. परिणामी मुंबई- नाशिक विभागात लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Kalyan- Kasara Route: कल्याण- कसारा रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार, प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरळीत
Kalyan- Kasara Route: कल्याण- कसारा रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार, प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरळीत
advertisement

हा प्रकल्प एमयूटीपी- 3A (Mumbai Urban Transport Project) अंतर्गत राबवण्यात येत असून, कल्याण ते कसारा दरम्यान तिसर्‍या रेल्वे मार्गाच्या उभारणीला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली होती. हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि दुसर्‍या टप्प्यात आसनगाव ते कसारा असा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या कल्याण ते आसनगाव दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असून, त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

advertisement

या विभागात प्रवाशांची प्रचंड गर्दी असली तरीही लोकल वारंवार उशिरा धावतात किंवा रद्द होतात. याचा फटका दररोज लाखो प्रवाशांना बसत होता. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी कल्याण- कसारा आणि कर्जत मार्गावर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकांची मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात होती. अखेर 30 डिसेंबर 2025 रोजी कल्याण ते कर्जत दरम्यान दोन अतिरिक्त मार्गिकांना अंतिम मंजुरी देण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात पुन्हा झाली वाढ, सोयाबीन आणि कांद्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

या नव्या मार्गिकांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि वेळेवर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय पनवेल- वसई उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरलाही लवकरच मंजूरी मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने यापूर्वीच एमयूटीपी- 3B हा प्रकल्प तातडीच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये समाविष्ट केला आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Kalyan- Kasara Route: कल्याण- कसारा रेल्वे कॉरिडॉरचा विस्तार, प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सुपरफास्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल