व्होट चोरीच्या मुद्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत निवदेन दिलं. यावेळी अमित शाह आणि काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यावेळी अमित शाह यांनी मतचोरीच्या मुद्यावर ३ उदाहरणं दिली.
"मतचोरीचं तीन प्रकार आहे, तुम्ही मतदार नाही आणि तरीही मतदार होतात ही मतचोरी आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने निवडून आला ती मतचोरी आहे. तिसरं म्हणजे, जनादेश नाहीये, मतदारांच्या विरोधात तुम्ही निवडून आला तरी मतचोरी समजली जाईल. आता मतचोरीची पहिली घटना ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा झाली होती. देशाचा पंतप्रधान ठरवायचा होता, त्यावेळी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष होते, त्यांच्या मताने पंतप्रधानपदाच्या व्यक्तीची निवड होणार होती. २८ मतं ही सरदार पटेल यांना मिळाली आणि २ मतं ही जवाहरलाल नेहरू यांना मिळाली होती. मग असं असतानाही, पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू बनले. ही सुद्धा व्होटचोरीच होती, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला.
advertisement
इंदिरा गांधींनी स्वतःला सूट दिली - अमित शाह
अनैतिक पद्धतीने निवडणूक जिंकूणे झालं होतं. मतचोरी झाली होती. इंदिरा गांधी या रायबरेलीमध्ये निवडणूक जिंकल्या होत्या. त्यानंतर निवडणूक योग्य पद्धतीने झाली नाही असं म्हणत राज नारायण हे अलाहाबाद कोर्टात गेले होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विजयावर संशय व्यक्त केला होता. कोर्टानेही हे मान्य केलं होतं, इंदिरा गांधी यांची निवडही योग्य प्रकारे झाली नाही, असं कोर्टाने नमूद केलं होतं. त्यानंतर पंतप्रधानपदाच्या व्यक्तीच्या विरोधात कुणीही तक्रार दाखल करू शकत नाही, असा कायदाच आणला होता. इंदिरा गांधी यांनी आपल्यासाठी सोयीचं करून घेतलं होतं, मग तुम्ही यावर आता काय बोलणार? असा सवालच शाहांनी काँग्रेसला विचारला.
तसंच, विरोधी पक्षनेते म्हणाले की, तुम्ही निवडणूक आयुक्तांना सूट दिली. मान्य आहे, आम्ही निवडणूक आयुक्तांना सूट दिली, परंतु इंदिरा गांधींनी स्वतःला सूट दिली. एवढंच नाहीतर क्रमांक २, ३ आणि ४ न्यायाधीशांना मागे टाकून त्यांनी क्रमांक ४ न्यायाधीशांना मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं आणि त्यांचा खटला जिंकला. हा इतिहास आहे, हे कोण नाकारू शकेल? असा सवालही शाहांनी उपस्थितीत केला.
नागरिक होण्यापूर्वी सोनिया गांधी मतदार झाल्या - अमित शाह
"सोनिया गांधी या देशाच्या नागरिक होण्यापूर्वी मतदार झाल्या होत्या, असा आरोप करून दिल्लीच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. असं अमित शाह म्हणताच यामुळे गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. अमित शाह यांनी उत्तर दिलं, "आता त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागेल; आम्हाला उत्तर देण्याची गरज नाही."
मग तुम्ही शपथ का घेतली? शाहांचा राहुल गांधींना सवाल
"आम्ही ४४ विधानसभा निवडणुका जिंकल्या, तुम्हीही ३० जिंकलात. जर मतदार यादी चुकीची होती, तर तुम्ही शपथ का घेतली? राहुल गांधी ज्या मतदारसंघातून निवडून आले होते तिथेही अशीच समस्या होती. तुम्ही त्याचे उत्तर का देत नाही? त्यांनी अमेठीचाही उल्लेख केला. तुम्ही त्याचे उत्तर का देत नाही?" ते मतदार यादीतील किरकोळ चुकांचा मुद्दा उपस्थित करतात. जेव्हा आपण हरतो तेव्हा आपण पक्षात त्यावर चर्चा करतो; जर तुम्ही हरलात तर निवडणूक आयोग चुकीचा आहे असं कसं? असा सवाल शाहांनी उपस्थिती केला.
जर घुसखोर मतदार यादीत असतील तर देशाची सुरक्षा धोक्यात आहे - अमित शाह
कायदेशीररित्या मतदार नसलेले लोक अजूनही मतदान करू शकत असतील तर देश कसा सुरक्षित राहू शकेल असा प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केला." शहा यांनी असेही पुनरुच्चार केलं की, मतदार यादीतून आता मृत्युमुखी पडलेल्यांची नावे काढून टाकणं अत्यंत महत्वाचे आहे. अशा विसंगतींमुळे निवडणूक प्रक्रियेत फेरफार करण्यास वाव निर्माण होतो.
काँग्रेसने २०१० मध्ये ते सादर केले, त्यामुळे कोणाचेही नाव वगळता येणार नाही - अमित शाह
गृहमंत्री अमित शाह यांनी एसआयआरचा इतिहास स्पष्ट करताना सांगितले की काँग्रेसने २०१० मध्ये ते सादर केले, त्यामुळे कोणाचेही नाव वगळता येणार नाही. पण आता आम्ही निवडकपणे घुसखोरांना काढून टाकू. घुसखोर पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री निवडू शकतो का? आपण परदेशी व्यक्तीला मतदानाचा अधिकार कसा देऊ शकतो?
