डिझाइन आणि बॉक्समध्ये काय आहे? रेडमी पॅड 2 प्रो हॅरी पॉटर एडिशन एका विशिष्ट निळ्या रंगात येतो ज्याच्या मागील पॅनलवर हॉगवर्ट्सचा लोगो छापलेला आहे. शाओमी काही हॅरी पॉटर-थीम अॅक्सेसरीज देखील देत आहे, ज्यात हे समाविष्ट आहे:
- टॅब्लेटसाठी संरक्षक कव्हर
- स्ट्रॅप असलेली बॅग
- वँड-स्टाइल स्टायलस (अतिरिक्त बदली टिपसह)
- Harry Potter थीम स्टिकर्स.
advertisement
इन एक्स्ट्रा अॅड-ऑन व्यतिरिक्त टॅबलेटचे हार्डवेयरमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Redmi Pad 2 Pro Harry Potter Edition चे फीचर्स
या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2560 × 1600 पिक्सेल आणि आस्पेक्ट रेशो 16:10 आहे. या डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 600 निट्स ब्राइटनेस आणि Gorilla Glass 3 प्रोटेक्शन आहे.
11,500 रुपयांनी स्वस्त मिळतोय दमदार iPhone! पहिल्यांदाच मिळतोय कमी किंमतीत
टच सँपलिंग रेट 360Hz पर्यंत आहे. तर स्टायलस इनपूट 240Hz पर्यंत सपोर्ट करतो. शाओमीनुसार, डिस्प्लेला अनेक TÜV Rheinland सर्टिफिकेशनही मिळाले आहेत.
परफॉर्मेंससाठी, यात Qualcomm Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आहे, जो 4nm टेक्नॉलॉजीवर बनवलेला आहे. या टॅबलेटमध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवता येते.
बॅटरी, ऑडिओ आणि सॉफ्टवेयर
Redmi Pad 2 Pro मध्ये 12,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यामध्ये USB Type-C पोर्ट मिळतो आणि ते Quick Charge आणि USB Power Delivery सारख्या स्टँडर्ड्सलाही सपोर्ट करतो.
WhatsAppवर कसे सायलेंट करावेत अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल, पाहा सोपी ट्रिक
ऑडियोसाठी टॅबलेटमध्ये चार स्पीकर्स, Dolby Atmos आणि Hi-Res Audio चा सपोर्ट देण्यात आला आहे. सोबतच यामध्ये मायक्रोफोनही उपलब्ध आहे. सॉफ्टवेयरविषयी बोलायचे झाल्यास हा टॅबलेट शाओमी HyperOS 3 वर चालतो.
कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी
टॅबलेटच्या कॅमेरा सेटअपमध्ये 8MPचा रिअर कॅमेरा आणि 8MPचा फ्रंट-फेसिंग अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरे 1080p व्हिडिओ रेकॉर्डिंग (30fps) ला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.4, 3.5mm मिमी हेडफोन जॅक आणि USB 2.0 यांचा सपोर्ट मिळतो.
Redmi Pad 2 Pro Harry Potter Edition ची किंमत
हा स्पेशल एडिशन टॅबलेट CNY 2,599 (जवळपास 34,500 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जो रेग्युलर मॉडलहून CNY 600 जास्त आहे. सध्या शाओमीने हे स्पष्ट केले नाही की, हे एडिशन चीनच्या बाहेर लॉन्च होणार की नाही.
