ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 28.6 लाख जणांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. तरुणांमधे हृदयविकाराशी संबंधित आजारांची ही आकडेवारी देशातलं गंभीर आरोग्य वास्तव सांगणारी आहे.
आपल्या हृदयाला पूर्वीपेक्षा जास्त धोका आहे. हृदयविकाराचा झटका आणि हृदयक्रिया बंद पडणं हे आता केवळ वृद्धांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही; त्याचा परिणाम तरुणांवरही होतो आहे. पण जीवनशैलीत काही बदल केले तर हृदयरोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो.
advertisement
हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी आहारात सुधारणा करणं हे सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. अतिरिक्त मीठ, साखर आणि ट्रान्स फॅटमुळे रक्तवाहिन्यांमधे अडथळा निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, आपल्या आहारात ओट्स, धान्य, कडधान्यं आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसंच, आपल्या आहारात मोसमी फळं आणि सुक्या मेव्याचाही समावेश करा.
दररोज किमान तीस मिनिटं वेगानं चालण्याचा प्रयत्न करा. श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि योगासनं देखील फायदेशीर आहेत.
धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा - धूम्रपान आणि तंबाखू हृदयासाठी विषारी आहेत. निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचित करते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. मद्यपानामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो.
Health Tip : झोपेतून उठलं की सकाळी तोंडाचा वास येतो ? तोंड कोरडं वाटतं ? पाहूयात असं होण्यामागची कारणं
तणाव व्यवस्थापन - आजच्या वेगवान जीवनात, तणाव हा एक अदृश्य मारेकरी बनला आहे. अतिरिक्त तणावामुळे कॉर्टिसोल या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयावर थेट दबाव येतो. तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि छंद जोपासा, ध्यानधारणा करा.
नियमित आरोग्य तपासणी आवश्यक - गंभीर लक्षणं दिसेपर्यंत लोक अनेकदा डॉक्टरांकडे जात नाहीत. तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर हृदयविकार टाळण्यासाठी, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमितपणे तपासा.
