वृद्धांसोबत घडला जीवघेणा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी प्रवाशाचे नाव शिवाजी बाबूराव कानडे (वय 65) असे असून ते फलटण-मुंबई एसटी बसने प्रवास करत होते. बस स्वारगेट स्थानकात उभी असताना चालकाने ती मागे घेतली. त्याच वेळी कानडे हे बसजवळ उभे होते. चालकाच्या निष्काळजीपणामुळे बस मागे घेतली गेली आणि बसचं चाक थेट त्यांच्या उजव्या पायावरून गेलं. काही क्षणातच परिसरात आरडाओरडा झाला. स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी तत्काळ धाव घेत त्या वृद्धाची मदत केली.
advertisement
या घटनेनंतर तातडीने कानडे यांना रुग्णवाहिकेतून ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. डॉक्टरांच्या मते त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रियेचीही गरज असू शकते. सुदैवाने जीव धोक्यात नाही.मात्र पायाला झालेली ही दुखापत गंभीर स्वरूपाची आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Pune : स्वागरेट बसस्थानकात वृद्ध व्यक्तीसोबत घडला जीवघेणा प्रकार; एसटी येताच सर्वांची आरडाओरड; नेमकं घडलं काय?
