मृत तृतीयपंथीय व्यक्तीचं नाव प्रकाश कोळी आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो आपल्या प्रियकरासोबत राहत होता. प्रियकराचं नाव सुजीत जमादार असं आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं जवळच्या व्यक्तींनी सांगितलं. मात्र सुजीत जमादार लवकरच दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचं प्रकाशच्या लक्षात आल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रकाश कोळी आणि सुजीत जमादार यांचे मागील ८ वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, समाजातील दडपणामुळे याबाबत फारशी वाच्यता झाली होती. एकमेकांवर प्रेम असतानाही सुजीतने अचानक एका मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुजीतने दिलेल्या प्रेमातील धोक्यामुळे प्रकाश मानसिकदृष्ट्या खचला. अखेर व्हिडीओ रेकोर्ड करत त्याने भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर गळफास घेत आयुष्य संपवले. दरम्यान, सुजीतने प्रकाशकडील सोनं, पैसे लुबाडून घेतल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. प्रकाशला त्याच्या घरातील व्यक्तींशी संबंध तोडण्यास भाग पाडले.
advertisement
घटना समोर आल्यावर सोलापूर जिल्हा रुग्णालय परिसरात तृतीयपंथीय समुदायाची मोठी गर्दी झाली. संबंधितांना कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावं लागलं असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रेमप्रकरणाची सोलापूरमध्ये तीव्र चर्चा रंगली असून अशा नात्यांमधील भावनिक शोषण आणि विश्वासघाताचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
