होलिडे सीझनमध्ये रेल्वेची मोठी भेट
प्रवाशांमध्ये सर्वाधिक मागणी असलेली मुंबई CSMT–करमाळी (01151/01152) ही विशेष गाडी 19 डिसेंबरपासून 5 जानेवारी 2026 पर्यंत दररोज धावणार आहे. ही गाडी मुंबई CSMT येथून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि दुपारी 1.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. परतीची गाडी करमाळीहून दुपारी 2.15 ला निघून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता मुंबईत पोहोचेल. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम येथे थांबे दिले आहेत.
advertisement
महाराष्ट्र-केरळ मार्गावरील वाढत्या गर्दीसाठी एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर (01171/01172) ही साप्ताहिक गाडीही सोडण्यात आली आहे. 18 आणि 25 डिसेंबर तसेच 1 आणि 8 जानेवारी रोजी ही गाडी एलटीटीहून सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 ला तिरुवनंतपुरम उत्तरला पोहोचेल. या गाडीला कोकण आणि केरळातील 40 पेक्षा जास्त स्थानकांवर थांबे आहेत.
तसेच एलटीटी–मंगळुरू (01185/01186) ही साप्ताहिक विशेष गाडी 16, 23, 30 डिसेंबर आणि 6 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 10.05 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. परतीच्या गाड्या अनुक्रमे 17, 24, 31 डिसेंबर आणि 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सुटतील. या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी आणि सुरतकल येथे थांबे आहेत.
