पहिली महिला क्रिकेटपटू
एकाच कॅलेंडर वर्षात पाच एकदिवसीय शतके झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. विशेष म्हणजे, तिने केवळ 41 इनिंग्जमध्ये तिचे सातवे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि यासह माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगचा 44 इनिंग्जचा विश्वविक्रम मोडला.
लंडन ऑलिंपिक खेळण्याचं स्वप्न भंगलं
क्रिकेटच्या आधी ताझमीन एक उत्कृष्ट भालाफेकपटू (Javelin Thrower) होती. 2010 च्या जागतिक ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले होते आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याचे तिचे स्वप्न निश्चित होते. मात्र, नियतीने वेगळेच ठरवले होते. 2011 मध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातामुळे तिचे ऑलिंपिक खेळण्याचे स्वप्न भंगले. महिने हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर, तिला भालाफेकीतील जुनी लय पुन्हा कधीच साधता आली नाही. आजसुद्धा तिच्या उजव्या बायसेपवरील ऑलिंपिक रिंग्जचा टॅटू तिला त्या तुटलेल्या स्वप्नाची आठवण करून देतो.
advertisement
हार न मानता लढत राहिली
तरीही हार न मानता, तिने क्रिकटच्या मैदानावर पाऊल ठेवले. 2018 पर्यंत ती भालाफेक करत राहिली, पण नंतर तिने पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केले. याच जिद्दीच्या बळावर, आज ती दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील सर्वात आघाडीच्या आणि सर्वात जलद शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक बनली आहे. अपघातामुळे एक मोठे स्वप्न भंगल्यानंतरही, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारी ताझमीन ब्रिट्सची कहाणी खरंच खूप प्रेरणा देणारी आहे.
करियरला ऐतिहासिक कलाटणी
न्युझीलंडविरुद्घचा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण त्यांनी आपल्या सुरुवातीच्या मॅचमध्ये इंग्लंडकडून दारूण पराभव पत्करला होता. जेव्हा टीमला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा ब्रिट्सने 232 धावांचा पाठलाग करताना शतक (101 धावा) ठोकून आपल्या संघाला 40.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून विजय मिळवून दिला. ब्रिट्सने आपल्या करिअरला एक नवीन आणि ऐतिहासिक कलाटणी दिली आहे. तिची सरासरी जवळजवळ तिप्पट झाली असून, तिने केवळ 22 इनिंग्जमध्ये 7 शतके झळकावली आहेत.
सर्वाधिक शतके ठोकण्याचा विश्वविक्रम
दरम्यान, ताझमीनने यंदाच्या वर्षात पाच शतकांची नोंद केली आहे, जी एका कॅलेंडर वर्षात महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विश्वविक्रम आहे. विशेष म्हणजे, तिने आपल्या मागील 5 इनिंग्जपैकी 4 इनिंग्जमध्ये शतक झळकावलं आहे.