झी मराठीवरील अनेक मालिका सध्या टीआरपीच्या रेसमध्ये स्टार प्रवाहवरील मालिकांना काँटे की टक्कर देताना दिसत आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याचं कारण म्हणजे, मालिकेचे काही प्रोमो. सध्या त्या मालिकेचे प्रोमो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. मालिकेच्या एका प्रोमोमध्ये असं दिसतंय की, मंजिरी शिवनाथला तिच्या नजर कैदेत ठेवते. त्यावेळी मीराला शिवनाथने तिच्यासाठी ठेवलेली एक चिठ्ठी तिला मिळते. त्या चिठ्ठीमध्ये मंजिरी कोण आहे? याबद्दल लिहिलेलं असतं. तिची खरी ओळख शोधणं हेच मीराचं ध्येय आहे, असं शिवनाथने सांगितलं. त्यातूनच तिच्या जन्माचं कारण तिला सापडेल असंही त्याने सांगितलं. देवी आईला मंजिरी आव्हान देते, तेव्हा देवी आई तुझा अंत जवळ आला आहे असं तिला सांगते.
advertisement
मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोबद्दल सांगायचं तर, मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये, मंजिरी मीराला जाळ्यात अडकवण्यासाठी "आईला तिच्या मुलीच्या बाळाला पाहायचं आहे" असं म्हणते. त्यावर मीरा चिडून 'माझ्या आईला जाळून मारण्यात आलं" असं म्हणते. त्यावर मंजिरी मीराचा चेहरा पकडते आणि "स्वतःची पायरी विसरू नकोस मीरा" अशी धमकी देते. त्यावर मीरा "तुझं हे खरे रूप मी सगळ्यांना दाखवणार" असं म्हणते. तेव्हा मंजिरी तिला आव्हान देते. 'जा सांग सगळ्यांना मी तुझ्या आईला मारलं. तू माझं खरं रूप शोधतेस की मी तुझं अस्तित्व मिटवते हे लवकरच समजेल." असं म्हणते. मालिकेतील या ट्विस्टमुळे आता ही मालिका लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. अद्याप मालिकेच्या निर्मात्यांकडून याबद्दलची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
