तुम्ही दुसऱ्या कोणासाठी आला आहात
मुंबई विमानतळावर जसप्रीत बुमराह याला संताप अनावर झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बुमराह फोटोग्राफरच्या गर्दीने वेढलेला विमानतळ सोडताना दिसत आहे. गर्दीमुळे बुमराह चिडला. मी तुम्हाला आमंत्रित केले नव्हते. तुम्ही दुसऱ्या कोणासाठी आला आहात, असं म्हणत बुमराहने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्याची वाट पाहताय तो मागून येतोय, असं बुमराह संतापून म्हणाला.
advertisement
पाहा Video
मला जाऊ द्या, बुमराहची विनंती अन्...
बुमराह संतापल्याचं पाहून पापाराझींनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. बुमराह भाई, तू माझ्यासाठी दिवाळीचा बोनस आहेस, असं म्हणत पापाराझींनी बुमराहला हसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुमराहने मला जाऊ द्या म्हणत गाडीचा मार्ग धरला. मला माझ्या गाडीकडे जाऊ दे म्हणत बुमराह गाडीत बसून गेला. त्याचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मॅचमध्ये बुमराहचा संताप
दरम्यान, 13 ऑक्टोबर रोजी दिल्ली कसोटीच्या चौथ्या दिवशी देखील बुमराह संतापल्याचं पहायला मिळालं होतं. मैदानात बॉलिंग करत असताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दोन धावा पूर्ण करताच, रागाच्या भरात बुमराहने बॉल त्याच्या हातात घेतला आणि स्टंप खाली पाडले. बुमराह यावेळी रागात होता, हे स्पष्टपणे दिसून आलं होतं.