TRENDING:

ऑफिसमध्ये महिलांनाच थंडी का लागते, पुरुषांना का नाही? संशोधनातून समोर आलं कारण

Last Updated:

Why women feel colder than men in office : बहुतेक ऑफिसमध्ये तुम्ही महिलांना जॅकेट घालून, शॉल किंवा स्कार्फ घेऊन पाहिलं असेल. तर पुरुष शर्ट, टी-शर्ट, पँटमध्ये अगदी आरामात बसलेले दिसतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना पाहिलं असेल तर बहुतेक महिला जॅकेट घालून, शॉल किंवा स्कार्फ घेतलेल्या दिसतात. तर पुरुष शर्ट, टी-शर्ट, पँटमध्ये अगदी आरामात बसलेले दिसतात. कित्येक ऑफिसचं असंच चित्र आहे. महिला कर्मचाऱ्यांना थंडी लागते. तर पुरुष कर्मचाऱ्यांना थंडी वाजत नाही, असं का? कधी विचार केला आहे का?
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

ऑफिसमधील एसीचा वाद किंवा प्रश्न कॉमन आहे. एसीचा फ्लो सारखाच असतो. तरी काहींना थंडी लागते तर काहींना नाही. विशेषत: महिलांना थंडी लागते तर पुरुषांना नाही. असं का? याबाबत एक संशोधन करण्यात आलं. महिलांना पुरूषांपेक्षा जास्त थंडी का वाजते. यामागे काही कारणं आहेत.

नवरा-बायकोचं रिल पाहून वाहतूक विभागाला घाम, ठोठावला दंड, असं केलं काय?

advertisement

मंद चयापचय : ​​महिलांचं शरीर हळूहळू ऊर्जा बर्न करतं, त्यामुळे त्यांच्या शरीरात कमी उष्णता निर्माण होते.

शारीरिक स्वरूप : महिलांमध्ये स्नायू कमी असतात ज्यामुळे उष्णता निर्माण होते आणि त्वचेखाली जास्त चरबी असते. चरबी शरीर व्यापतं, पण त्यामुळे जास्त थंडी जाणवते.

हार्मोनल बदल : मासिक पाळी दरम्यान हार्मोन्स बदलत राहतात, ज्यामुळे शरीराच्या तापमानावर परिणाम होतो.

advertisement

2015 मध्ये नेचर क्लायमेट चेंजमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 1960 च्या दशकात, सरासरी 40 वर्षांच्या पुरुषाच्या चयापचय म्हणजे शरीरातील ज्वलनशील ऊर्जेचा दराच्या आधारे ऑफिसचं तापमान निश्चित केलं जात असे. यामुळे महिलांची प्रत्यक्ष गरज सुमारे 35% जास्त असल्याचा अंदाज होता. म्हणूनच महिलांना ऑफिसचं तापमान थंड आणि अस्वस्थ वाटू लागलं.

तापमानाचा कामावर परिणाम

advertisement

2019 मध्ये PLOS One मध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. अभ्यासात 500 लोकांचा समावेश होता.  संशोधनातून असं दिसून आलं आहे की हे तापमान महिलांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतं.  जेव्हा खोली उबदार असते तेव्हा महिला गणित आणि भाषेच्या कामांमध्ये चांगली कामगिरी करतात. दुसरीकडे, पुरुषांनी थंड खोलीत थोडं चांगलं काम केले, पण फरक खूपच कमी होता. यामुळे संशोधकांचा असा विश्वास आहे की जर ऑफिसचं तापमान थोडं वाढवलं तर महिलांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि पुरुषांच्या कामावर परिणाम होणार नाही. म्हणजेच ऑफिस थोडं उबदार ठेवल्याने वातावरण सर्वांसाठी आरामदायी बनू शकतं आणि कामाचे रिझल्ट चांगले येतील.

advertisement

माणसासारखा बोलणारा पोपट आता मोबाईलही वापरू लागला, चोचीने कसा चालवतो फोन पाहा VIDEO

आज तकच्या वृत्तानुसार दिल्लीच्या इंटरनल मेडिसीन एक्सपर्ट डॉ. गीता प्रकाश म्हणतात की महिलांना जास्त थंडी वाजण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बऱ्याचदा त्यांचा रक्तदाब थोडा कमी असतो, ज्यामुळे त्या थंडीबद्दल अधिक संवेदनशील होतात. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक महिला व्यवस्थित जेवू शकत नाहीत, ज्यामुळे व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते आणि जास्त थंडी वाजते. जास्त वेळ वातानुकूलित ऑफिसमध्ये बसल्याने शरीरात कडकपणा येऊ शकतो, विशेषतः ज्या महिलांमध्ये कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
ऑफिसमध्ये महिलांनाच थंडी का लागते, पुरुषांना का नाही? संशोधनातून समोर आलं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल