TRENDING:

पारंपरिक शेती परवडत नव्हती, बीडच्या युवा शेतकऱ्यानं निवडलं पैशाचं पीक, कमाई 10 लाख!

Last Updated:
Sericulture Success: पारंपरिक शेतीला फाटा देत बीडच्या शेतकऱ्यानं वेगळा पर्याय निवडला. आता रामप्रभू बडे हे वर्षाला 10 लाखांची कमाई करत आहेत.
advertisement
1/5
पारंपरिक शेती परवडत नव्हती, युवा शेतकऱ्यानं निवडलं पैशाचं पीक, कमाई 10 लाख!
सध्याच्या काळात मराठवाड्यातील अनेक शेतकरी पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतीत विविध प्रयोग करत आहेत. बीडमधील एका युवा शेतकऱ्याने  नवे तंत्रज्ञान आत्मसात करत चौकटीबाहेर विचार केला आणि मागील तीन वर्षांपासून ते रेशीम शेती करत आहे. याच रेशीम शेतीतून त्यांना दरवर्षी चांगला नफा मिळत आहे.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यातील गावंदरा येथील युवक शेतकरी रामप्रभू बडे हे ऊस, कापूस, बाजरी आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड करत होते. सतत बदलणारे हवामान, मजुरीचा वाढता खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नवा पर्याय शोधला आणि रेशीम शेतीकडे वळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
3/5
बडे यांनी पहिल्यांदा रेशीम शेतीसाठी लागणाऱ्या तुतीच्या झाडांची लागवड केली. त्यानंतर तुतीच्या पानांवर वाढणाऱ्या कोषांच्या रेशीम किड्यांच्या पालनाची सुरुवात केली. नियमित व्यवस्थापन, योग्य तापमान नियंत्रण आणि अन्नपुरवठा यामुळे त्यांच्या रेशीम शेतीला लवकरच चांगले परिणाम दिसू लागले.
advertisement
4/5
रेशीम उत्पादनाच्या पहिल्याच हंगामात त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. यानंतर त्यांनी याच शेतीत अधिक गुंतवणूक करत मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या रेशीम शेतीतून दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. पारंपरिक शेतीपेक्षा हे उत्पन्न अनेक पटींनी जास्त असून शेतीचा खर्चही तुलनेने कमी असल्याचे ते सांगतात.
advertisement
5/5
रामप्रभू बडे यांच्या मते, शेतीमध्ये सातत्याने नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. पारंपरिक शेतीतील तोटा पाहता शेतकऱ्यांनी पर्यायी शेती पद्धतीचा विचार केला पाहिजे. रेशीम शेतीसाठी सरकारकडून अनुदान आणि प्रशिक्षण मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी ही संधी साधून आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करावा. (प्रशांत पवार, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
पारंपरिक शेती परवडत नव्हती, बीडच्या युवा शेतकऱ्यानं निवडलं पैशाचं पीक, कमाई 10 लाख!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल