TRENDING:

मित्राचा सल्ला ऐकला अन् केली पैशांची शेती, नववी पास शेतकरी 3 एकरात मालामाल!

Last Updated:
Agriculture Success: दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात फळबागांची शेती केली जातेय. मोहोळ तालुक्यातील नववी पास शेतकरी द्राक्ष शेतीतून लाखोंची कमाई करतोय.
advertisement
1/7
मित्राचा सल्ला ऐकला अन् केली पैशांची शेती, नववी पास शेतकरी 3 एकरात मालामाल!
सध्याच्या काळात अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फळबागांची शेती करत आहेत. एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात देखील प्रगत शेती केली जातेय. यातून शेतकरी चांगला नफा देखील मिळवत आहेत.
advertisement
2/7
मित्राने दिलेला सल्ला ऐकून शेती केल्याने शेतकरी संतोष हे लखपती होणार आहेत. या संदर्भात अधिक माहिती मोहोळ तालुक्यातील दाईंगडेवाडीचे शेतकरी शेतकरी संतोष दाइंगडे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
3/7
शेतकरी संतोष दाइंगडे यांचं शिक्षण नववीपर्यंत झालंय. पूर्वी ते पांरपरिक शेती करत होते. परंतु, मित्राच्या सल्ल्याने त्यांनी द्राक्षांची बाग लावली. आता या शेतीतून त्यांना 25 लाखांपर्यंत नफा मिळणार आहे.
advertisement
4/7
संतोष यांनी मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दीड एकरात माणिक चमन या जातीच्या द्राक्षाची लागवड केली. तर दीड एकरात क्लोन या जातीच्या द्राक्षाची लागवड केली आहे.
advertisement
5/7
गेल्या तीन ते चार वर्षांपासून तीन एकरात ते द्राक्ष शेती करत आहेत. द्राक्षांच्या बागेत दररोज पाहणी करून योग्य त्या औषधांची फवारणी केली आहे. त्यामुळे या द्राक्षांवर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही.
advertisement
6/7
द्राक्ष बागेची लागवड करण्यासाठी तीन एकराला लागवड, औषध फवारणी, मजुरी आदी खर्च मिळून तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. तर द्राक्ष विक्रीतून त्यांना 20 ते 25 लाख रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती संतोष यांनी दिली आहे.
advertisement
7/7
संतोष यांचे बागेतील द्राक्षे विक्री तसेच बेदाणा तयार करण्यासाठी सांगोला, तासगाव येथे पाठवले जात आहेत. उच्चशिक्षित तरुणांना नोकरी मिळत नसेल तर निराश न होता त्यांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन तरुण शेतकरी संतोष दाइंगडे यांनी केले आहे. (इरफान पटेल, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
मित्राचा सल्ला ऐकला अन् केली पैशांची शेती, नववी पास शेतकरी 3 एकरात मालामाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल