TRENDING:

कोकण नव्हे, हे तर सोलापूर! नारळाच्या शेतीतून लाखोंची कमाई, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?

Last Updated:
Coconut Farming: सोलापूरच्या शेतकऱ्यानं चक्क नारळाची शेती केलीये. एक एकर क्षेत्रात वर्षाला 4 ते 5 लाखांचं उत्पन्न घेत आहेत.  
advertisement
1/5
कोकण नव्हे, हे तर सोलापूर! नारळाच्या शेतीतून लाखोंची कमाई, शेतकऱ्यानं काय केलं?
नारळ म्हटलं की आपणास कोकणाची आठवण होते. परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात  60 वर्षीय आजोबांनी नारळाची बाग फुलवली आहे. कुरुल गावातील विष्णू तुकाराम ननवरे यांनी ही किमया साधली आहे. नारळाच्या या बुटक्या जातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या संदर्भात अधिक माहिती 60 वर्षीय आजोबा विष्णू ननवरे यांनी Local 18 बोलताना दिली.
advertisement
2/5
विष्णू ननवरे यांचे शिक्षण 1969 ला अकरावी पर्यंत झाले आहे. ननवरे यांनी तज्ज्ञांच्या मदतीने 40 अंश सेल्सिअस तापमानात एका एकरात ही नारळाची बाग फुलवली. 15 बाय 15 वर लागवड करत त्यांनी एका एकरात 145 नारळांची लागवड केलीये.
advertisement
3/5
एका नारळाच्या झाडापासून विष्णू ननवरे यांना 100 पेक्षा अधिक नारळ मिळत आहेत. ही नारळाची बाग तयार करण्यासाठी ननवरे यांना 70 ते 75 हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तसेच विष्णू ननवरे यांनी या नारळाच्या बागेत दोन वेळा कांदा आणि मेथीच्या भाजीचे आंतरपीक घेऊन दोन वर्षात दोन लाखाचे उत्पन्न देखील त्यांनी मिळवले आहे.
advertisement
4/5
30 रुपये दराप्रमाणे एका झाडापासून जवळपास 5 ते 6 हजारांचा फायदा होतो. तर 145 झाडे एकरी 4 ते 5 लाखांचं उत्पादन देतात. त्यामुळे ही नारळाची शेती फायद्याची ठरत आहे.
advertisement
5/5
या नारळाच्या झाडांची उंची कमी असल्याने अगदी हाताने देखील नारळ तोडू शकता. तसेच या झाडांना नारळ देखील भरपूर लागतात. विष्णू ननवरे यांना या नारळ शेतीतून भरघोस उत्पन्न मिळत असून त्यांच्या बागेची पंचक्रोशित चर्चा आहे. (इरफान पटेल, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
कोकण नव्हे, हे तर सोलापूर! नारळाच्या शेतीतून लाखोंची कमाई, शेतकऱ्यानं कशी केली कमाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल