TRENDING:

PBKS vs GT : पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस अय्यरने काढली गंभीरच्या वर्ल्ड कप प्लॅनची हवा, कुणालाच लक्षात आली नव्हती चूक!

Last Updated:
Shreyas Iyer Exposed Gautam Gambhir plan : श्रेयस अय्यरच्या स्मार्ट कॅप्टन्सीने गुजरात टायटन्सला मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचता आलं नाही. यावेळी श्रेयसने गंभीरच्या प्लॅनची देखील हवा काढल्याचं पहायला मिळालं.
advertisement
1/7
PBKS vs GT : पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस अय्यरने काढली गंभीरच्या वर्ल्ड कप प्लॅनची हवा, कुणालाच लक्षात आली नव्हती चूक!
आयपीएल 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला आहे. पंजाबने रोमांचक सामन्यात तीन विकेट्सने गुजरातचा पराभव केला.
advertisement
2/7
श्रेयस अय्यरच्या स्मार्ट कॅप्टन्सीने गुजरात टायटन्सला मोठ्या स्कोरपर्यंत पोहोचता आलं नाही. पंजाबने गुजरातचा गाडा 162 धावांवरच रोखला. यावेळी श्रेयसने गंभीरच्या प्लॅनची देखील हवा काढल्याचं पहायला मिळालं.
advertisement
3/7
साई सुदर्शन, शुभमन गिल, जॉस बटलर यांना श्रेयसने आपल्या स्मार्ट प्लॅनिंगच्या रणनितीने आऊट केलं पण यावेळी श्रेयसच्या रडारवर होता, गौतम गंभीरचा खास खेळाडू... वॉशिंग्टन सुंदर...
advertisement
4/7
वॉशिंग्टन सुंदर याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये घेतलं होतं. त्याला एका मॅचमध्ये संधी मिळाली, ती म्हणजे इंग्लंडविरुद्धची मॅच... त्यातील खराब कामगिरीनंतर त्याला पुन्हा संधी दिली गेली नाही.
advertisement
5/7
तगडे प्लेयर्स असताना गंभीरने लाडक्या खेळाडूला स्कॉडमध्ये घेतलं पण चांगली कामगिरी करून श्रेयस अय्यरला चार हात लांब ठेवलं. याचाच राग श्रेयसने काढला.
advertisement
6/7
वॉशिंग्टन सुंदर प्रमोशन मिळून बॅटिंगला मैदानात येताच श्रेयसने पुन्हा फास्टर बॉलर्स बॉलिंगला आणले. वॉशिंग्टनर सुंदरला एकही मोठा शॉट पंजाबच्या बॉलर्सने खेळू दिला नाही. तर 19 व्या ओव्हरमध्ये त्याला घरचा रस्ता दाखवला.
advertisement
7/7
वॉशिंग्टन सुंदरने पंजाबविरुद्ध 16 बॉलमध्ये फक्त 18 धावा केल्या, ज्यात फक्त दोन फोर सामील होते. तर बॉलिंगमध्ये देखील त्याला चांगलाच चोप बसला. 3.1 ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने 27 धावा खर्च केल्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PBKS vs GT : पहिल्याच मॅचमध्ये श्रेयस अय्यरने काढली गंभीरच्या वर्ल्ड कप प्लॅनची हवा, कुणालाच लक्षात आली नव्हती चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल