TRENDING:

अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं, 7 वर्षांनी PSI ला शिक्षा, 27 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: केवळ पीडितेकडे परवाना नसल्यामुळे अपघाताची जबाबदारी तिच्यावर टाकता येत नाही, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: एखाद्या वेळी न्याय मिळण्यास उशीर होईल, पण तो मिळतोच, असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. टाउन हॉल उड्डाणपुलावर झालेल्या दुर्दैवी अपघातात अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात तिच्या कुटुंबाला 7 वर्षांनी न्याय मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणाने या प्रकरणात 27 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून, ही रक्कम विमा कंपनी, वाहन मालक आणि चालक यांनी संयुक्तपणे अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं, 7 वर्षांनी मिळाला न्याय, 27 लाख भरपाईचे आदेश
अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं, 7 वर्षांनी मिळाला न्याय, 27 लाख भरपाईचे आदेश
advertisement

या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी कुटुंबाला दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात आकेफा मेहरीन हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत दोषारोपपत्रही सादर करण्यात आले.

प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह, ‎5 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ, छ. संभाजीनगर घटना

advertisement

22 एप्रिल 2019 रोजी दुपारी आकेफा मेहरीन ही दुचाकीवरून आरेफ कॉलनीहून भडकल गेटकडे निघाली होती. दरम्यान, जामा मशिदीकडून वेगात येणाऱ्या कारने टाउन हॉल उड्डाणपुलावर तिच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही कार सिटी चौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष पाटे चालवत होते. या अपघातात आकेफाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असतानाच 24 एप्रिल 2019 रोजी तिचा मृत्यू झाला.

advertisement

या घटनेनंतर आकेफाच्या आई-वडिलांनी अॅड. फय्याज पटेल आणि अॅड. सईद शेख यांच्या माध्यमातून मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान विमा कंपनीने, मृत मुलगी अल्पवयीन होती आणि तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नव्हता, असा युक्तिवाद मांडला. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावत अपघात हा कार चालकाच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचे स्पष्ट केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चांगापूरचं प्रसिद्ध हनुमान मंदिर, ‘त्या’ विहिरीला 108 प्रदक्षिणा, पूर्ण होतात मनोकामना, Video
सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत न्यायाधिकरणाने नमूद केले की, केवळ पीडितेकडे परवाना नसल्यामुळे अपघाताची जबाबदारी तिच्यावर टाकता येत नाही. त्यामुळे कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचा निर्णय न्यायाधिकरणाने दिला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं, 7 वर्षांनी PSI ला शिक्षा, 27 लाखांची भरपाई देण्याचे आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल