Banana Farming: दुष्काळी मराठवाड्यात लावलं पैशाचं पीक, शेतकऱ्यानं सांगितलं नफ्याचं गणित!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Banana Farming: दुष्काळी मराठवाड्यात जालन्याच्या शेतकऱ्यानं केळीची बाग लावलीये. 30 गुंठे शेतात 9 लाखांपर्यंतचं उत्पन्न निघणार असल्याचं शेतकऱ्यानं सांगितलं.
advertisement
1/5

सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देऊन आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात एका शेतकऱ्यानं असाच प्रयोग केला आहे. महादेव काळे असं दहिफळ येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव आहे.
advertisement
2/5
मराठवाड्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन ही प्रमुख पिके घेतली जातात. मात्र त्यांनी टिशू कल्चर पद्धतीची केळीची रोपे मागवून केळीची बाग फुलवली आहे. या बागेतून 600 क्विंटल केळीचे उत्पन्न अपेक्षित असून किमान 9 लाख उत्पन्न होईल, असं महादेव काळे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
3/5
जालना जिल्ह्यातील दहिफळ येथील महादेव काळे मागील अनेक वर्षांपासून केळीची शेती करतात. परंतु मागील काही वर्षांत दुष्काळी परिस्थिती असल्याने शेती करणं बंद केलं. पाण्याचा सोर्स उपलब्ध झाल्याने गतवर्षी जुलै महिन्यात आणली. नाईन जातीची ही रोपे 9 रुपये प्रतिरोप याप्रमाणे मिळाली. केळीच्या 1550 रोपांची पाच बाय पाच या पद्धतीने लागवड केली.
advertisement
4/5
30 गुंठे क्षेत्रामध्ये दोन ट्रॉली शेणखत वापरले. त्याच पद्धतीने पोटॅश, सल्फर आणि इतर रासायनिक खतांच्या मात्रा योग्य प्रमाणात दिल्या. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खतांचे योग्य व्यवस्थापन केलं. सध्या त्यांची केळीची बाग ही 10 महिन्यांची झाली असून केळी मधून घड निघण्यास सुरुवात झाली आहे.
advertisement
5/5
सध्या केळीला बाजारात 2 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. आपण 50 किलोचा एक घड गृहीत धरला तर 600 ते 700 क्विंटल केळीचे उत्पन्न 30 गुंठ्यांमध्ये अपेक्षित आहे. याला बाजारात 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला तरी देखील 9 ते 10 लाखांचं उत्पन्न होईल, असं महादेव काळे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Banana Farming: दुष्काळी मराठवाड्यात लावलं पैशाचं पीक, शेतकऱ्यानं सांगितलं नफ्याचं गणित!