TRENDING:

Maruti Wagon R आता विसरा! Tata आणतेय टँकसारखी Car, किंमत असणार सगळ्यात कमी

Last Updated:
अलीकडेच जीएसटीच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. आता टाटा मोटर्स लवकर आणखी एक स्वस्त आणि मस्त अशी कार लाँच कऱण्याच्या तयारीत आहे, जी मारुती सुझुकीला टक्कर देणारी ठरणार आहे. 
advertisement
1/8
Maruti Wagon R आता विसरा! Tata आणतेय टँकसारखी Car, किंमत असणार सगळ्यात कमी
Tata Motors च्या गाड्या म्हटलं की दणकट, मजबूत आणि सुरक्षेच्या बाबतीत अव्वल असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून टाटा मोटर्सने मार्केटमध्ये टँक सारख्या सेफ कार देऊन मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अलीकडेच जीएसटीच्या दरात कपात झाली आहे. त्यामुळे कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. आता टाटा मोटर्स लवकर आणखी एक स्वस्त आणि मस्त अशी कार लाँच कऱण्याच्या तयारीत आहे, जी मारुती सुझुकीला टक्कर देणारी ठरणार आहे.
advertisement
2/8
छोट्या कार सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचा मोठा दबदबा आहे. alto k10 पासून ते maruti wagon r ची विक्री सर्वाधिक आहे. आता टाटा मोटर्स आपली लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक Tiago चं नवीन व्हेरिएंट 2026 फेसलिफ्ट लाँच करण्याच्या तयारीत आहे. या Tiago 2026 ची टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. या वर्षांच्या अखेरीस नवीन Tiago 2026 लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
3/8
Tiago 2026 फेसलिफ्टच्या पुढील भागात स्लिम ग्रिल, नवीन हेडलॅम्प्स आणि बंपर नवीन मिळणार आहे. हेडलॅम्प्स अधिक शार्प आणि मॉडर्न असेल आणि  नवीन LED डीआरएल सिग्नेचर असण्याची शक्यता आहे. तसंच मागील बाजूला  नवीन टेलगेट, LED टेललॅम्प्स आणि फ्लॅट बंपर असण्याची शक्यता आहे.
advertisement
4/8
Tiago 2026 मध्ये  नवीन अलॉय व्हील्स डिझाइन असेल आणि नवीन रंगाचा पर्यायही मिळेल. आत   केबिनमध्ये नवीन डॅशबोर्ड येईल. ज्यात मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (१०.२५ इंचपर्यंत) आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असू शकतो. नवीन स्टीयरिंग व्हील येईल, जे सगळ्याच टाटांच्या गाड्यांमध्ये वापरलं जातं.
advertisement
5/8
Tiago 2026 मध्ये नवीन फीचर्समध्ये  इन्फोटेनमेंट स्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल आणि 360-डिग्री कॅमेरा सुद्धा असून शकेल. एवढंच नाहीतर सनरुफ सुद्धा मिळण्याची चिन्ह आहे. 
advertisement
6/8
Tiago 2026 ही सेफ्टीच्या बाबतीत दणकट कार आहे. आता मार्केटमध्ये असलेलं मॉडेल हे 4-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मि्ळालेले आहे. नवीन Tiago 2026 मध्ये ६ एअरबॅग्स मिळतील आणि सोबतत इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), हिल स्टार्ट असिस्ट, ABS सोबत EBD आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर असेल.
advertisement
7/8
Tiago 2026 च्या इंजिनमध्ये फार असा कोणताही बदल अपेक्षित नाही. सध्या 1.2-लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन आहे तेच राहणार आहे. हे इंजिन  86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क देतं. 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय असेल. या मध्ये ICNG चा सुद्धा पर्याय आहे. मायलेजच्या बाबतीत ही कार 20-23 किमी इतकं मायलेज देईल.
advertisement
8/8
Tiago 2026 ही आताच्या टियागोपेक्षा आणखी स्वस्त असणार आहे.  सध्या या Tiago ची किंमत एक्स-शोरूम  4.57 लाख रुपये आहे आणि आता नवीन येणारे मॉडेल हे आणखी स्वस्त असणार अशी चर्चा आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Maruti Wagon R आता विसरा! Tata आणतेय टँकसारखी Car, किंमत असणार सगळ्यात कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल