IPL 2026 : शेवटच्या ओव्हरला मोठा राडा, अर्शदिपने तमाशाच केला, 110 दिवसानंतरही चूक सुधारली नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या सामन्यात शेवटच्या ओव्हरला अनेक घडामोडी घडल्या. जसं एका वाईडच्या रिव्ह्यूचा डिसिजन घेण्यासाठी 5 मिनिट खेळ थांबला होता.
advertisement
1/7

आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 3 विकेट राखून पराभव केला आहे. पंजाबच्या या विजयाचा शिल्पकार कुपर कॉनोली ठरला आहे.कारण त्याने 44 बॉलमध्ये 77 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.
advertisement
2/7
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करत हा सामना 3 विकेट राखून जिंकला आहे.
advertisement
3/7
या सामन्यात शेवटच्या ओव्हरला अनेक घडामोडी घडल्या. जसं एका वाईडच्या रिव्ह्यूचा डिसिजन घेण्यासाठी 5 मिनिट खेळ थांबला होता.
advertisement
4/7
यानंतर अर्शदिपने सर्वांसमोर आपलं नाक कापलं आहे. कारण अर्शदिपने या सामन्यात 11 बॉलची ओव्हर टाकली होती.
advertisement
5/7
श्रेयस अय्यरने अर्शदिप सिंहला सामन्याची शेवटची ओव्हर दिली होती. या ओव्हरमध्ये त्याने 11 बॉल टाकले होते.ज्यात त्याने 4 वाई़़ड, एक नो बॉल, त्यानंतर एक चौकार, एक धाव आणि 2 लेगबाईस अशा एकूण 12 धावा काढल्या.
advertisement
6/7
अर्शदिप सिंह आधी पाच खेळाडूंनी अशी खराब कामगिरी केली आहे. यामध्ये मोहम्मद सिराज आघाडीवर आहे.त्याने 2023 ला मुंबईविरूद्ध अशी गोलंदाजी केली होती. तुषार देशपांडे,शार्दुल ठाकूर, संदीप शर्मा आणि हार्दिक पांड्याने देखील असा घाणेरडा विक्रम केला आहे.
advertisement
7/7
दरम्यान आयपीएलआधी म्हणजे जवळ जवळ 110 दिवस आधी अर्शदिप आफ्रिकेसोबत टी20 खेळत होता. या सामन्यात देखील 13 बॉलची एक ओव्हर टाकली होती त्यात त्याने 7 वाईट टाकले होते.त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीवर प्रचंड टीका होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : शेवटच्या ओव्हरला मोठा राडा, अर्शदिपने तमाशाच केला, 110 दिवसानंतरही चूक सुधारली नाही