TRENDING:

कीड अन् रोगाचा त्रास नाही, खर्च कमी आणि उत्पन्नही जोरदार, गुजराथी शेतकरी नेमकं कशाची शेती करतोय?

Last Updated:
आजकाल शेतकरी शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगले उत्पन्न घेत आहे. सरकारच्या वतीनेही शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी स्वतः नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर लाखो रुपये कमवत आहे. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे अंजीरच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. (बोटाड, प्रतिनिधी)
advertisement
1/5
कीड अन् रोगाचा त्रास नाही, खर्च कमी आणि उत्पन्नही जोरदार, गुजराथी शेतकरी नेमकं..
गुजरात राज्यातील बोटाड येथील शेतकरी आता आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, अंजीरच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. येथील शेतकरी दिनेशभाई जीवराजभाई वघासिया यांनी एक बिघा जमिनीत 60 अंजीरची झाडे लावली. यातून ते जॅम बनवतात आणि आपल्याच दुकानातून तब्बल 1 हजार रुपये प्रति किलो या दराने विकतात.
advertisement
2/5
53 वर्षीय प्रगतिशील किसान दिनेशभाई जीवराजभाई वघासिया हे बोटाड येथील गढा गावातील रहिवासी आहे. ते मागील 20 वर्षांपासून शेती करत आहेत. त्यांनी एक बिघा जमिनीत अंजीरची शेती केली आहे. त्यात त्यांनी 60 अंजीरची झाडांची लागवड केली. त्यांना अंजीरचे चांगले उत्पादन होते. मात्र, ते त्यांना बाजारात विकत नाहीत.
advertisement
3/5
दिनेशभाई या अंजीरपासून स्वत:च जॅम तयार करतात आणि त्याची पॅकेजिंग करतात. या अंजीरच्या जॅमची त्यांच्या दुकाना ते 1 हजार रुपये प्रति किलो दराने विक्री करतात. 60 झाडांपासून एकूण 20-22 हजार अंजीरचे उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
4/5
अंजीरच्या रोपांना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता नसते. या झाडांना फार कमी पाणी लागते आणि त्यावर लक्ष देऊन चांगले उत्पादन मिळते. दिनेशभाई हे यावर जीवामृत फवारतात, त्यामुळे कमी खर्चात चांगले पीक येते.
advertisement
5/5
विशेष म्हणजे अंजीर लागवडीमध्ये कीड किंवा रोगांचा त्रास होत नाही. त्यामुळे खर्च कमी आणि नफा जास्त असतो, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
कीड अन् रोगाचा त्रास नाही, खर्च कमी आणि उत्पन्नही जोरदार, गुजराथी शेतकरी नेमकं कशाची शेती करतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल