TRENDING:

Success Story : नोकरी गेली, परिस्थितीसमोर हार नाही मानली, संतोष भाजीपाला शेतीतून कमतोय वर्षाला 5 लाखांचा नफा

Last Updated:
अचानक हातातून रोजगार निसटल्याने कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र, परिस्थितीवर हार न मानता त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
1/5
नोकरी गेली, परिस्थितीसमोर हार नाही मानली, शेतीतून कमतोय वर्षाला 5 लाखांचा नफा
बीड जिल्ह्यातील नित्रुड या गावातील संतोष चव्हाण या तरुण शेतकऱ्याची कथा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. दोन वर्षे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असताना त्यांना कंबरेचा आजार झाला आणि त्यामुळे नोकरी गमवावी लागली. अचानक हातातून रोजगार निसटल्याने कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला. मात्र, परिस्थितीवर हार न मानता त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/5
कुटुंबियांच्या सल्ल्याने संतोष यांनी करार पद्धतीने दोन एकर शेती घेतली आणि शेती व्यवसायात हात आजमावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी विविध पिकांचा अभ्यास करून बाजारातील मागणी पाहिली. अखेर त्यांनी एका एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मेहनत, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी सिंचनाच्या नियोजनामुळे उत्पादनात सातत्याने वाढ झाली.
advertisement
3/5
कांद्याचे उत्पादन चांगले मिळाल्यामुळे संतोष यांनी हळूहळू आपला अनुभव वाढवला आणि मार्केटशी थेट संपर्क साधला. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत तसेच थेट बाजारपेठांशी जोडल्याने त्यांना मधल्या दलालांपासून मुक्तता मिळाली. त्यामुळे प्रति हंगाम साधारणतः तीन लाखांचा आणि वार्षिक जवळपास पाच लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळविण्यात ते यशस्वी झाले.
advertisement
4/5
आज संतोष चव्हाण हे आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या यशामागे कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी आहेत. त्यांनी दाखवून दिले आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास आणि सातत्य असेल तर शेतीतही मोठे यश मिळवता येते.
advertisement
5/5
भविष्यात संतोष चव्हाण कांद्याबरोबरच इतर भाजीपाला पिकांची लागवड करण्याचाही विचार करत आहेत. शेतीत नवीन प्रयोग करत राहण्याची त्यांची जिद्द हीच त्यांना पुढे आणखी मोठे यश मिळवून देईल, असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Success Story : नोकरी गेली, परिस्थितीसमोर हार नाही मानली, संतोष भाजीपाला शेतीतून कमतोय वर्षाला 5 लाखांचा नफा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल